सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
राज्यात सध्या MPSC घोटाळा चर्चेत असतानाच सार्वजनिक आरोग्य विभागातील “प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी” पदांची बोगस भरती प्रक्रीया उघड झाली आहे. यामध्ये पात्रता नसताना अनेक उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामुळे या बोगस भरतीत सामील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंद करा आणि बोगस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरतीतील अपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ समाप्त करा, अशी लेखी तक्रार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये पी. एम. सी. रजिष्ट्रेशन नसलेले, वैद्यकीय प्रयोगशाळा शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीका धारण नसलेले, 12 वी पास झाल्यानंतर डीएमएलटी केलेले अशा एकूण 442 बोगस उमेदवारांची यादीच सादर केली आहे.
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग पुणे-6 या कार्यालयात सन 2023-24 या कालावधीत 600 ते 650 पदांची भरती करण्यात आली. यामध्ये पात्रता नसताना उमेदवारांना नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बोगस भरतीत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंद करून बोगस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरतीतील अपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ समाप्त करण्याची मागणी केली आहे. तसेच यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई अद्याप पर्यंत का केली जात नाही ? बोगस उमेदवारांच्या सेवा समाप्त का केल्या जात नाहीत ? सध्या कार्यरत अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत ? कारवाईस टाळाटाळ करणारे अधिकारी देखील यामध्ये सामिल आहेत का ? अशी चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.
शरत शेट्टी यांच्याकडून 442 बोगस उमेदवारांची यादीच सादर…
सदरच्या भरती घोटाळ्यातील बोगस उमेदवारांची यादीच शरत शेट्टी यांनी तक्रारी अर्जाबरोबर मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे सादर केली आहे. ज्यामध्ये पीएमसी रजिष्ट्रेशन नसलेले 55 उमेदवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदाचे सेवा प्रवेश नियम शासन निर्णय दि. 29 सप्टेंबर 2021 नुसार वैद्यकीय प्रयोगशाळा शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदविका धारण नसलेले 288 उमेदवार, 12 वी पास झाल्यानंतर डीएमएलटी केलेले 99 उमेदवार अशा एकूण 442 बोगस उमेदवारांची यादी सादर केली आहे. त्यामुळे संबंधीत उमेदवारांची सेवा समाप्ती तत्काळ करणे गरजेचे आहे.
उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड पदमुक्त, उपसंचालक डॉ. भगवान पवारांना मात्र अभय
“आरोग्य मंत्री हटाव, आरोग्य विभाग बचाव”चे विविध पोस्टर सोशल मिडीयावरती व्हायरल




