सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
सार्वजनिक आरोग्य विभागात चुकीचे काम केल्यास उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते वैद्यकीय अधिकारी-कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना घरचा रस्ता दाखवणारे, निलंबन करणारे आरोग्य मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांचा दबदबा होता. परंतु अनेक तक्रारी, गुन्हे दाखल असुनही आरोग्य मंत्री आबिटकर यांच्याकडून पूर्वी डॉ. राधाकिशन पवार, डॉ. राजेश गायकवाड आणि आता डॉ. भगवान पवार यांच्यावर मात्र कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या दुटप्पी आणि सोयीस्कर कारवाईची नकारात्मक चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली असुन सध्या “आरोग्य मंत्री हटाव, आरोग्य विभाग बचाव”चे विविध पोस्टर सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसुन येत आहेत. यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये प्रथमच नकारात्मक चर्चांना सुरवात झाल्याचे पहावयास मिळत आहे.
यापुढेही जाऊन “व्हायरल झालेले पोस्टर आणि आरोग्य विभागातील सत्यकथा” आरोग्य विभागातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, आरोग्य भवन आणि जीटी हॉस्पिटलच्या इमारतीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत शिस्तीत पोहचवले आहेत. त्यामुळे येत्या काळात डॉ. भगवान पवार, डॉ. राधाकिशन पवार, डॉ. राजेश गायकवाड हे नेहमीप्रमाणे आरोग्य विभागातच दिसतील खरे, परंतु आरोग्य मंत्री बदलल्यास नवल वाटायला नको…
हे ही वाचा तुकाराम मुंढे साहेब, खासगीच नाही तर शासकीय यंत्रणांमध्येही जादा दराने औषध खरेदी…
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याबाबतीत व्हायरल झालेले अनेक पोस्टर “सत्ताकारण”च्या हाती लागले असुन त्यातील काही निवडक पोस्टर पुढील प्रमाणे…







