पुणे : प्रतिनिधी
पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर मधील 7 जणांना चौकशीस हजार राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्याअनुषंगाने यातील संबंधीत 7 जण 26 मार्च 2024 रोजी उपसंचालक कार्यालयात हजर होते. परिणामी सदरची चौकशी पूर्ण झाली असून पुढील कारवाईचा अहवाल मात्र गुलदस्त्यात आहे.
हे ही वाचा उपसंचालकांकडून सिव्हील सर्जनसह 7 जणांना हजर राहण्याच्या सूचना
चौकशी मध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील सिव्हील सर्जनसह इतरांचा समावेश होता. त्यांच्यावर “अत्यंत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी, मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता आणि शासनाच्या तरतुदीचा भंग केल्याचा” ठपका ठेवला होता. यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील आणि सध्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील, अधिपरिचारीका वहिदा शेख, कनिष्ठ लिपीक युसूफखान पठाण, सहाय्यक अधिक्षक मनिषा नागेश बंदपट्टे, सांखिकी अन्वेषक सचिन काकडे आणि औषध निर्माता पी. व्ही. जामगांवकर यांचा समावेश होता.
स्वप्नील ढगेंना स्वतंत्र निमंत्रण
सदरच्या चौकशी दरम्यान बिलिंग सेक्शन क्लार्क स्वप्नील ढगे यांचे नाव कोठेच नव्हते. वित्तीय अनियमिततेचा ठपका ठेवल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सकांची नावे चौकशीत येतात. परंतु खुद्द बिलिंग सेक्शन क्लार्कचे नाव चौकशीत नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागात वेगळीच चर्चा रंगली होती. अखेर सदरचे वृत्त “सत्ताकारण”ने प्रसिध्द केले. परिणामी वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याने सदरची गोष्ट लक्षात येताच बिलिंग सेक्शन क्लार्क स्वप्नील ढगेंना स्वतंत्र निमंत्रण पाठवले होते. परिणामी तेही यावेळी उपस्थित राहिले असून त्यांचीही यावेळी चौकशी झाली.
हे ही वाचा टक्केवारीनंतर आरोग्यातील अधिकाऱ्यांनी दिली सप्लायरला ऑर्डर
वित्तीय अनियमिततेत बिलिंग सेक्शन क्लार्कला उपसंचालकांकडून अभय ?