सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
बलात्कारी, स्त्रीलंपट अन् भ्रष्टाचारी अधिकाऱ्याविरोधात आरोग्य विभागातील अनेक महिला भगिनी यांनी “पाठलाग करून अश्लिल बोलणे, नकोसा स्पर्श करणे, मानसिक व शारिरीक छळ करणे, लैंगिक छळ करणे, बलात्कार करणे अशा गंभीर तक्रारी पोलिस स्टेशन, जिल्हा महिला तक्रार निवारण समिती आणि विशाखा समितीकडे दाखल केल्या. त्याच स्त्रीलंपट अधिकाऱ्याला “बलात्कार अन् भ्रष्टाचारांच्या” तक्रारीमुळे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी निलंबन केले, परिणामी त्या मुजोर अधिकाऱ्याने “मी मागासवर्गीय अधिकारी असल्याने तानाजी सावंत यांनी माझे निलंबन केले आहे…” अशी लेखी तक्रार तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे केली, तर फलटणमध्ये खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना “मी मराठा आहे” असा दिशाभुल करणारा लेखी जबाब देऊन सहानुभुती मिळवली, त्यानंतर यापूर्वीचे गुन्हे तर वेगळेच, सध्या 7 महिन्यात ACB, खंडणी आणि डॉ. आत्महत्या प्रकरण असे 3 गुन्हे दाखल झाले आहेत, असे असताना अशा बलात्कारी, स्त्रीलंपट अन् भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला सध्या आरोग्य मंत्र्यांकडून अभय दिले जात असल्याने आरोग्य विभागात वेगळीच चर्चा रंगली असून “हे भगवान…” म्हणण्याची वेळ आली आहे.
आरोग्य मंत्री यांनी 108 ऍम्ब्युलन्स वेळेत न पोहचल्याने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मनोहर बनसोडे यांचे निलंबन केले, एकीकडे 108 ऍम्ब्युलन्सचे कोट्यावधींचे टेंडर देणार BVG ला, आणि निलंबन जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे, अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरणी तेथील जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे निलंबन योग्यच, पण त्या प्रकरणात संबंध नसताना अकोला सर्कलचे उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाघचौरे यांचे निलंबन केले. मात्र दुसरीकडे पुणे सर्कलमधील अधिकाऱ्यावर बलात्कार, लैंगिक छळ अन् भ्रष्टाचाराच्या लेखी तक्रारी, अनेक विभागीय चौकशा, यापूर्वी 3 वेळा निलंबन, खंड क्षमापणाचे आदेश देण्यासाठी 3 टक्के वसुल, क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी प्रत्येकी अडीच लाख रूपये, वरिष्ठांच्या अधिकाराचा गैरवापर करून मर्जील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या अन् बदल्या, औषध खरेदीत आर्थिक अनियमितता, रात्रीस व्हीसी घेऊन महिलांना त्रास देणाऱ्या याच अधिकाऱ्यास कारवाईत आणि सवंर्ग बदलात देखील सुट दिली गेली. त्यामुळे या अधिकाऱ्यावर आरोग्य मंत्र्यांकडून कारवाई नाही, तर अभय दिले जात आहे. मात्र इतर अधिकाऱ्यांवर नाहक निलंबनाची कारवाई केली जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या दुटप्पी कारभारावर आरोग्य विभागातील संघटना, अधिकारी, कर्मचारी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी पोहचल्या आहेत.
आरोग्य मंत्र्यांना मॅनेज केलेय, मला कोणी काही करू शकत नाही…
आरोग्य मंत्री एकीकडे संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, पंरतु हाच अधिकारी सर्कलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दमबाजी करत आहे की, मी आरोग्य मंत्र्यांना मॅनेज केलेय, मला कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी दुसरी बाजु लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक गुन्ह्यात “मी प्रामाणिक काम करतो म्हणून तक्रारी करतात, तो मी नव्हेच, मला नाहक गोवले गेलेय…” अशी गुळगुळीत उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करणे गरजेचे आहे.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर




