प्रतिनिधी : रणजित वाघमारे
गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशनात आणि गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य विभागाशी संबंधीत विविध तारांकीत प्रश्न उपस्थित झाले. यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारी टक्केवारी, जादा दराने औषध खरेदी, मशीनरी खरेदी, ॲम्ब्युलन्स खरेदी घोटाळा आदी विषय सभागृहात गाजले. खुद्द विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याअनुषंगाने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे “ॲक्शन मोड”वर आले असून त्यांनी अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या महिन्यात आरोग्य विभागातील आणखी काही अधिकारी निलंबीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तत्काळ आणि योग्य निर्णयामुळे आरोग्य विभागाचे नाव पुन्हा राज्यभरात उंचावत आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळा प्रकरणी आरोग्य विभागाकडून “औरंगाबाद खंडपीठाचा अवमान”
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 25 मार्च 2025 रोजी बीडचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली. त्यांच्यावर कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा यांनी केला होता. परिणामी त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर रूग्णास तत्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्याने डॉ. मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले होते. आता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतेच आरोग्य विभागाच्या सचिवांना लेखी पत्राव्दारे कळवले आहे की, विधानसभा तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने पुढील अधिकाऱ्यांवर चौकशी करून अहवाल सादर करावा व कारवाई करावी. यामध्ये भंडारा येथील रूग्णालयात MCH Wing चालू झाली नसतानाही 20 कोटी रूपयांची उपकरणे खरेदी केली. परिणामी सदरची उपकरणे विनावापर पडून आहेत. याला जबाबदार सहसंचालक, उपसंचालक व जिल्हा शल्य चिकीत्सक यांची चौकशी करून अहवाल सादर करावा. बीड जिल्ह्यामध्ये कोविड काळात अनियमितता झाल्याने डॉ. अशोक थोरात यांची विभागीय चौकशी, विभागीय चौकशीदरम्यान संबंधीत अधिकाऱ्यांकडून चौकशीस विलंब झाल्याबाबत खुलासा घ्यावा.
हे ही वाचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांवर कार्यवाही करून 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी घेतलेल्या वाहनांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा यांची चौकशी करण्यात यावी, त्यांचा अहवाल 8 दिवसात सादर करावा, यवतमाळ येथील औषधामध्ये गढुळता आढळल्याची बाब औषध व अन्न प्रशासन यांच्या तपासणी अहवालात निदर्शनास आली होती. परंतु याबाबत संबंधीत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतःहून कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. याबाबत संबंधितांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याचा अहवाल 8 दिवसात सादर करावा, अशा लेखी सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.
हे ही वाचा नसेल तर संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करा
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून तत्काळ कारवाई करून भ्रष्टाचारास आळा घालण्याच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अन्यथा तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात आणि नंतरही आरोग्य विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहीला आहे. घोटाळे, भ्रष्टाचार, खरेदीत घोळ आदींमुळे आजही आरोग्य विभाग बदनाम होताना दिसून येत आहे. मात्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांच्या तत्काळ आणि योग्य निर्णयामुळे आरोग्य विभाग पुन्हा रूळावर येत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा “विकास” सुरूच
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”