पुणे : प्रतिनिधी
एकीकडे लोक रस्त्यावर आहेत, त्यांना नोकरी नाही. दुसरीकडे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना रूग्णसेवा करण्यासाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो. आरोग्यसेवा ही जनतेच्या गरजेची आहे. त्यामुळे जनतेची आरोग्य सेवा करा, अन्यथा निलंबनाला सामोरे जा, असा इशारा देत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी “प्रकाश” टाकला. तसेच कारवाई करताना कुणाची दया-माया करायची गरज नाही. चुकीची कामे करून पैसे मिळवू नका. लोकांची कामे करा अथवा निलंबनाला सामोरे जा, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
नवनियुक्त सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रीपद स्विकारल्यानंतर प्रथमच पुण्यातील जिल्हा रुग्णालय, येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. येथील पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, येरवडा मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री आबिटकर म्हणाले, माझे विधानसभेतील आतापर्यंतचे रेकॉर्ड बघा, निलंबनासाठी सर्वाधिक आग्रह धरणारा मी आमदार आहे. आता राज्यात सर्वाधिक निलंबन करणारा मंत्री मी असेन. ‘येरवडा मनोरुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांना निम्माच पगार ठेकेदार देतो. त्यावरून आंदोलनेही झाली. मनोरुग्णांची स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचे काम अपूर्ण झाल्याने रुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. कामाचे संपूर्ण बिल मात्र कंत्राटदाराला दिले गेले आहे. ज्या रुग्णांचे नातेवाईक नाहीत, त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. परंतु त्या केंद्रांत सुविधा नाहीत. त्यामुळे वर्षभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याकडे केंद्रचालकांचे आणि येथील अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने याबाबत सुधारणा होत नसल्याची वस्तुस्थिती आरोग्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी येथील वैद्यकीय अधीक्षकांची खरडपट्टी करत संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा : आरोग्य विभागात ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने 75 कोटींची वसुली
औंध जिल्हा रूग्णालयाची पाहणी
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री आबिटकर यांनी शुक्रवारी सकाळी औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी मनोरुग्णालयातील स्वयंपाक गृह, महिला व पुरुष मनोरुग्ण कक्ष, त्यांचे स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एकंदरीत स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच मनोरुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना त्यांची समस्या सांगता येत नाही. परंतु, त्यांची काळजी घेणे, उपचार करणे हे येथील अधिकाऱ्यांचे काम आहे. जर स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नसेल तर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढायला हवी. तसे न झाल्यास आरोग्य खात्याकडून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
हे ही वाचा आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड