सोलापूर : प्रतिनिधी
420 : सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणाऱ्या मक्तेदारास तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सहीचे मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधीतावर व यात सामिल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याबाबत अतिरीक्त आयुक्त कारंजे यांना विचारले असता त्यांनी कागदपत्रांची तपासणी होईल, त्यानंतर यामध्ये संबंधीत मक्तेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर 420 चा गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा False Bond | महापालिकेला खोटा बाँड देऊन मिळवली “मक्तेदारी”
महापालिकेकडील (Municipal Corporation) विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत (government service) असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता (tender) देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. या शपथपत्रात त्यांनी माझे नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकणे, नळाचे कठडे दुरूस्ती करणे आदी कामे घेतली आहेत. तर याच कामांची बिले काढण्याचे काम सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक असलेले त्यांचे वडिल विलास कुलकर्णी हे करत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूण दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नगर अभियंता चलवादी यांच्याकडून अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी मक्तेदार प्रमाणपत्रासाठी जोडलेली कागदपत्रे, त्यांनी 28 जुलै 2017 ते 7 जानेवारी 2024 पर्यंत मिळवलेली दोन प्रमाणपत्रे, प्रत्येक झोन निहाय भरलेले टेंडर व केलेली कामे, प्रत्येक कामाची काढण्यात आलेली बिले, थकीत बिले, आस्थापना नोंदणीचा दाखला, विक्रीकर विभागाकडील कागदपत्रे, GST प्रमाणपत्र, बँकेचे सॉलवन्सी प्रमाणपत्र, इन्कम टॅक्स (Income tax) रिटर्न्स फाईल आदी कागदपत्रांची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधीत प्रकरणात त्या-त्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यापासून ते कामे मिळवूण देऊन बिले काढण्यापर्यंत ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत सदरची चौकशी पूर्ण करून वरिष्ठांकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता चलवादी यांनी सांगितले. तर या संदर्भात टक्केवारी घेऊनही त्रास दिल्याने काही मक्तेदार आंदोलनाच्या तयारीत अहेत.
हे ही वाचा संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा