सोलापूर : प्रतिनिधी
False Bond : महापालिकेला लुटण्याचे काम तेथीलच अधिकारी-कर्मचाऱी करत असल्याची ओरड शहरवासियांची आहे. त्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग नेहमीच असल्याचे निदर्शनास येत आहे. असाच प्रकार गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी केला असून त्यांनी महापालिकेला खोटा बाँड (False Bond) देऊन “मक्तेदारी” मिळवली आहे.
हे ही वाचा संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा
महापालिकेकडील विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. यामध्ये त्यांनी माझे नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. झोन क्रमांक आठ मधील ड्रेनेज लाईन टाकणे, नळाचे कठडे दुरूस्तीची 7 लाख 49 हजार 367 रूपयांची कामे केली आहेत. दुसरीकडे याच कामांची बिले काढण्याचे काम त्यांचे वडिल विलास कुलकर्णी यांनी केले आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रीयेत अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांना मक्तेदार प्रमाणपत्र देणारे अधिकारी, विविध कामांचे टेंडर देणारे अधिकारी, कामांची मंजुरी देणारे अधिकारी, बिले काढणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रमाणपत्र रद्द करावे. महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुरूप्रसाद कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनेक मक्तेदारांकडून केली जात आहे. False Bond
याबाबत मुख्य लेखापाल कार्यालयातील विलास कुलकर्णी यांना गुरूप्रसाद कुलकर्णी आणि अनंत कंन्स्ट्रक्शनबद्दल विचारले असता त्यांनी गुरूप्रसाद हा मुलगा असल्याचे सांगितले. तसेच कित्येक बिले मंजुरीसाठी येतात. त्यामुळे अनंत कंन्स्ट्रक्शन मात्र कोणाचे आहे ? याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
False Bond