– वरिष्ठांच्या मर्जीने नागेश चौधरींचा प्रताप
– अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या भूमीकेकडे लक्ष
सोलापूर : प्रतिनिधी
Medical College : एन. एच. एम आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कॉम्प्युटर ऑपरेटर नागेश चौधरी यांना कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केले होते. असे असताना पुन्हा चौधरी यांना गैरप्रकारे सेवेत सामावून घेतले आहे. मात्र त्याहुन कहर म्हणजे सेवेत सामावून घेतल्यानंतर चौधरी यांचे गैरप्रकार सुरूच असून त्यांची नेमणुक मेडिकल कॉलेजमध्ये असताना ते कामकाज मात्र जि. प. आरोग्य विभागात करत आहेत. नागेश चौधरी यांच्या याही गैरप्रकाराला कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पाठबळ आहे की ते स्वतःच स्वतःच्या मर्जीने जि. प. आरोग्य विभागात कार्यरत आहेत ? अशी शंका आरोग्य विभागातून उपस्थित केली जात आहे.
हे ही वाचा NHM | लेखी आदेश देऊनही NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या पत्राला केराची टोपली
एन. एच. एम आरोग्य विभागांतर्गत कार्यरत कार्यक्रम सहायक तथा डाटा एंन्ट्री ऑपरेटर नागेश चौधरी यांच्या विरोधात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्याकडे अनेक लेखी व तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावित कलेल्या नस्तीनुसार 4 जुलै 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश चौधरी यांना सेवेतुन कार्यमुक्त केले होते. त्यानंतर चौधरी यांनी विनंती अर्ज आणि 100 रूपयांचे बंधपत्र सादर केले. परिणामी चौधरी यांना पुन्हा साथरोग विभागांतर्गत डॉ. वै. स्मृ. शा. वे. महाविद्यालय, सोलापूर येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील रिक्त पदावर पुनश्चः नियुक्ती देण्यात आली. Medical College
मात्र यानंतरही नागेश चौधरी यांचा प्रताप सुरू असून त्यांनी साथरोग विभागांतर्गत डॉ. वै. स्मृ. शा. वे. महाविद्यालय, सोलापूर येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात कार्यरत न राहता जि. प. आरोग्य विभाग येथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडून काय कारवाई केली जाणार ? याकडे मेडिकल कॉलेज आणि जि. प. आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
गरज नसेल तर चौधरींना कार्यमुक्त करा
नागेश चौधरी हे सेवेत असताना फाईल गहाळ करणे, दस्तावेजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे, नस्तीमधील नोटींगकरीता दिशाभुल सल्ला देणे, वरीष्ठ अधिकारी यांच्याशी उच्च आवाजात व आरेरावीची भाषेमध्ये बोलणे, कार्यालयातील महत्वाच्या बावी व माहीतीचे फोटो, झेरॉक्स काढून त्रयस्त व्यक्तीस देणे आदी प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या चुका नागेश चौधरी यांच्या मार्फत झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना काढून टाकले होते. त्यानंतर गैरमार्गाने त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. मात्र सध्या ते मेडिकल कॉलेज ऐवजी जि. प. आरोग्य विभागात कार्यरत आहेत. जर मेडिकल कॉलेजमध्ये कार्यक्रम सहायक तथा डाटा एंन्ट्री ऑपरेटरची गरज नसेल तर चौधरींना कार्यमुक्त करा, अशी मागणी केली जात आहे. Medical College
हे ही वाचा Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
प्रतिक्रीया देण्यास डॉ. सोनिया बागडेंची टाळाटाळ
– नागेश चौधरी हे कोणाच्या आदेशानुसार मेडिकल कॉलेज ऐवजी जि. प. आरोग्य विभाग येथे कार्यरत आहेत ? याबाबत प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्या दोन दिवसांपासून प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे एकीकडे त्यांचे कामकाज चांगले सुरू असताना दुसरीकडे अशा गैरप्रकाराला थारा देत आहेत का ? अशी चर्चा जि. प. आरोग्य विभागात रंगली आहे. Medical College