सोलापूर : प्रतिनिधी
Unauthorized Parking : बेगम पेठ येथे अनेक इमारतीच्या पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू असल्याची लेखी तक्रार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी दिली होती. यासंबंधीचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये प्रसिध्द झाले होते. परिणामी सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या प्रमुख सारिका अकुलवार यांनी येथील पाहणी करण्यासाठी आज अधिकारी पाठवणार असून त्यानंतर वस्तुस्थितीच्या पाहणीनंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रारदार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बेगम पेठ (Begum Peth) येथे बांधकाम परवाना नुसार बांधकाम केलेले नाही, परवानगी घेताना महापालिकेच्या नियमानुसार तळमजला पार्किंगसाठी सोडण्यात आला आहे. परंतु सध्या प्रत्यक्षात तेथे अनेक शॉप (गाळे) बांधून भाड्याने देण्यात आले आहेत. याला रफिक मस्तुमसाब खरादी, रियाज महम्मद पटेल, अफसर शेख, कुरेशी, पिरजादे आदी जबाबदार आहेत. पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. शासनाच्या टॅक्सची चोरी होत आहे. काही ठिकाणी दोन मजल्यांचा परवाना घेऊन प्रत्यक्षात पाच मजली बांधकाम केले आहे. अतिरिक्त FSI वापरून बांधकाम करण्यात आले आहे, महापालिकेच्या नियमानुसार सेट बॅक मार्जिन सोडलेली नाही, संबंधीत अनेक इमारतींचा वापर परवाना न घेता इमारत वापरात आणली आहे. अशा पध्दतीने गैरप्रकार करत पार्किंगच्या जागी शॉप/गाळे (Unauthorized Parking) सुरू असल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांना, तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना नाहक ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील रहिवासी जनतेलाही दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील बेकायदेशीर पार्किंगमधील शॉपवर कायदेशीर कारवाई करून पाडकाम करावे, शॉप/गाळे धारकांकडून 2001 पासून कमर्शिअल टॅक्स आणि दंड वसुल करावा, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी सांगितले.
हे ही वाचा Unauthorized Parking | बेगम पेठेत पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू
तरी सदरील प्रकरणाकडे महापालिका प्रशासनाने (Solapur Municipal Corporation) लक्ष देऊन संबंधीतांवर बेकायदेशीर बांधकाम पाडून दंडात्मक कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी केली आहे.
बेगम पेठेत यांनी सुरू केले पार्किंगच्या जागेत अनधिकृत उद्योग-व्यवसाय…
– बेगम पेठेत रफिक मस्तुमसाब खरादी, रियाज महम्मद पटेल, अफसर शेख, कुरेशी, पिरजादे आदींनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसायास सुरवात केली. येथे खजराना, पराग फॅशन, पिरजादे वेल्डिंग वर्क्स, फेमिना फॅशन, अब्दुल्लाह ज्वेलर्स, मेमन होलसेल कलेक्शन, पाकिजा कलेक्शन, अप्सरा हॉटेल, न्यु अप्सरा हॉटेल आदींचा समावेश आहे.
हे ही वाचा Vande Bharat Express | डिसेंबरमध्ये ‘या मार्गावर’ धावणार वंदे भारत एक्सप्रेस
‘एक लाजरान् साजरा मुखडा’,Rupali Bhosle चा नऊवारी पैठणीतील मनमोहक साज