Vande Bharat Express : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला आणखी एका Vande Bharat Express ची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सध्या पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही. परंतु मुंबई ते सोलापूर या मार्गावर सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत आहे. दरम्यान, पुणे शहरातून थेट Vande Bharat Express लवकरच सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. पुणे ते वडोदरा या मार्गावर Vande Bharat Express चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस केव्हा धावणार ? याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
अशातच देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार रांची ते वाराणसी या मार्गावर Vande Bharat Express धावणार आहे. याबाबत रांचीच्या खासदारांनी नुकतीच माहिती दिली आहे. त्यांनी या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. रांची-वाराणसी वंदे भारत धावण्याची तारीख रेल्वे मंत्री लवकरच स्पष्ट करतील. मीडिया रिपोर्ट्स मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या मार्गांवरील वंदे भारत सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे.
अर्थातच डिसेंबर 2023 अखेर पर्यंत या मार्गावर Vande Bharat Express Train धावणार आहे, असे सांगितले जात आहे. दरम्यान या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस रांची ते वाराणसी हा प्रवास तेरा तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करेल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.