रणजित वाघमारे
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी Lady Boss असे गौरोद्गार मिळवणाऱ्या सुजाता सौनिक यांच्या हाती राज्याची धुरा आहे. त्या सक्षमपणे राज्याची धुरा सांभाळतही आहेत. तसेच राज्याच्या पोलिस दलाच्या प्रमुख तथा ‘पोलिस महासंचालक-DGP’ पदी रश्मी शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालय – प्रधान सचिव पदी अश्विनी भिडे, राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर शोमिता बिश्वास, राज्याच्या कायदाच्या मुख्य अधिकारी तथा विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवळे, महाराष्ट्र राज्याच्या प्रिंसिपल अकाउंट जनरल म्हणून जया भगत कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या सावित्रीच्या लेकींच्या हाती राज्याची धुरा असल्याचे पहावयास मिळत आहे. आणि या सावित्रीच्या लेकी राज्य चालवण्यास सक्षम असल्याचेही दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यात “Women In Leadership Roles”मध्ये आहेत, हे मात्र नक्की. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“मंत्रालयातही IAS महिलाराज…”
मंत्रालयातील सक्षम आणि कणखर अशा IAS महिला अधिकारी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे राज्यातील विविध विभागांच्या प्रमुख पदी नेमणुका केल्या आहेत. अनेक विभागांच्या प्रधान सचिव पदी त्या कार्यरत आहेत. ज्यामध्ये मराठी भाषा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात अमुस पदी मनिषा म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागात सह सचिव पदी स्मिता निवतकर, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) पदी व्ही. राधा, अमुस (SEO-1) पदी सीमा व्यास, माहिती व तंत्रज्ञान संचालक पदी निमा अरोरा, गृह विभाग प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) पदी राधिका रस्तोगी, महसुल व वन विभाग अमुस (मदत व पुनर्वसन) पदी डॉ. सोनिया सेठी, वित्त व क्रीडा विभाग सचिव (रिफॉर्स) पदी शैला ए., उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात अमुस (ऊर्जा) पदी आभा शुक्ला, प्रधान सचिव (कामगार) पदी आय. ए. कुंदन, पर्यावरण विभाग आणि बहुजन कल्याण व इतर मागासवर्गीय विभागात प्रधान सचिव पदी विनिता वैद सिंघल, गृहनिर्माण विभाग अमुस पदी वल्सा नायर सिंह, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग प्रधान सचिव पदी तसेच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण पदी जयश्री भोज या कार्यरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात “म्हारी छोरीयां छोरो से कम है के” असे वास्तवात चित्र पहावयास मिळत आहे. मंत्रालयातही IAS महिलाराज आहे. महाराष्ट्रातील “नारीशक्ती”ची ताकद मंत्रालयातही दिसून येत आहे, जी महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही महिला अधिकाऱ्यांचं कौतुक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनीही महाराष्ट्रातील महिला अधिकारी या ‘महाराष्ट्र सशक्तीकरणासाठी खुप मोठे योगदान देत असल्याचे” गौरोद्गार काढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही महिला अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले होते.