– खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणाऱ्याने स्वत:च दिला अर्ज
– तरीही होणार 420 चा गुन्हा दाखल
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवलेल्या मक्तेदाराने अखेर स्वत:च “अनंत कंस्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) रद्द करा” असे पत्र सोलापूर महापालिकेचे नगर अभियंता यांना दिले आहे. मात्र संबंधीत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सदरच्या मक्तेदाराने महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे प्रमाणपत्र रद्दचा अर्ज दिला तरीही संबंधीत मक्तेदार व त्याचे महापालिकेतील नातेवाईक यांच्यावर 420चा गुन्हा दाखल होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा False Bond | महापालिकेला खोटा बाँड देऊन मिळवली “मक्तेदारी”
सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणारा मक्तेदारा गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी 24 मार्च 2023 रोजी नगर अभियंता यांना नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपले कडील अनंत कंस्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र तात्पुरते स्वरूपात स्थगिती/रद्द करण्यात यावे. मी कंत्राटदार अनंत कंस्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गूरूप्रसाद वि. कुलकर्णी, रा. सोलापूर माझे तुमचे कार्यालयाकडे नोंदणी वर्ग क-1 व नोदंणीचे क्रमांक 158/2020-2021 असा आहे. तरी माझे वैयक्तिक व आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने मी आपले कार्यालयातील चालू वर्षातील कोणतेही काम करू शकत नाही. तरी मला चालू वर्षामध्ये तात्पुरत्या स्वरूपात तुमच्याकडे नमुद असलेले नोंदणी प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती/रद्द करण्यात यावे, ही माझी नम्र विनंती. Registration Certificate
हे ही वाचा 420 | …तर खोट्या बाँडव्दारे “मक्तेदारी” मिळवणाऱ्यांवर होणार 420 चा गुन्हा दाखल
संबंधीत मक्तेदारास तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सहीने मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराबरोबरच महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यामध्ये सामिल असून त्यांच्यावरही काय कारवाई होणार ? याची चर्चा महापालिकेबरोबरच शहरात रंगली आहे. Registration Certificate
महापालिकेकडील (Municipal Corporation) विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत (government service) असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता (tender) देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. या शपथपत्रात त्यांनी माझे नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यांनी महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकणे, नळाचे कठडे दुरूस्ती करणे आदी कामे घेतली आहेत. तर याच कामांची बिले काढण्याचे काम सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक असलेले त्यांचे वडिल विलास कुलकर्णी हे करत असल्याचा आरोप आहे.Registration Certificate
हे ही वाचा संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा
खोट्या बाँडव्दारे मक्तेदारी मिळवल्याचा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूण दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नगर अभियंता चलवादी यांच्याकडून अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी मक्तेदार प्रमाणपत्रासाठी जोडलेली कागदपत्रे, त्यांनी 28 जुलै 2017 ते 7 जानेवारी 2024 पर्यंत मिळवलेली दोन प्रमाणपत्रे, प्रत्येक झोन निहाय भरलेले टेंडर व केलेली कामे, प्रत्येक कामाची काढण्यात आलेली बिले, थकीत बिले, आस्थापना नोंदणीचा दाखला, विक्रीकर विभागाकडील कागदपत्रे, GST प्रमाणपत्र, बँकेचे सॉलवन्सी प्रमाणपत्र, इन्कम टॅक्स (Income tax) रिटर्न्स फाईल आदी कागदपत्रांची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधीत प्रकरणात त्या-त्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यापासून ते कामे मिळवूण देऊन बिले काढण्यापर्यंत ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत सदरची चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येणार होती. परंतु पंधरा दिवस झाले तरी अद्याप चौकशी सुरू असून संबंधीत कोणावरही कारवाई झाली नाही.
Registration Certificate
हे ही वाचा K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा