छावा संघटनेची प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
कोरोना (Corona vaccine) काळात डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी सोलापूर जिल्हयासाठी प्राप्त होणाऱ्या लसी साठवणूक करण्याकरीता प्राथमिक आरोग्य् केंद्राचा वापर जिल्हा लस भांडार म्हणून केला आहे. येथे विज गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची बॅकअपची व्यवस्था नव्हती. तसेच त्या ठिकाणी आवश्यक ते कोल्ड स्टोअरेज बॉक्स नाहीत. जिल्हा स्तरावर लस हातळण्याचा कोणताही अनुभव नसलेले कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात लस साठा वाया गेला आहे. तरी या प्रकारास सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव (Principal Secretary, Department of Health) संजय खंदारे यांच्याकडे केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्हयासाठी पुणे केंद्रातून कोविडची लस (Corona vaccine) देण्यात येत होत होती. सदर लस ठेवण्यासाठी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी नियमबाह्य पद्धतीने प्रा. आ. केंद्र टेंभ्रुणी या प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली होती. हे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्राम पंचायत गावच्या ठिकाणी असून त्या ठिकाणी वीज गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची बॅकअप व्यवस्था नाही. त्या ठिकाणी आवश्यक ते कोल्ड स्टोअरेज बॉक्स नाहीत. जिल्हा स्तरावर लस हातळण्याचा कोणताही अनुभव नसलेले कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. असे असताना प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्ह्याचा साठा ठेवणे व तेथून अनअनुभवी लोककडून वितरित करणे या बाबत ही सखोल चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करावी. अयोग्य प्रकारे लस हाताळणी केल्यामुळे लसीची क्षमता कमी झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम कोविड उपाययोजना करणे कामी झाल्याने लस घेवूनही प्रतिकार क्षमता विकसित न होणे या विषयी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांना जबाबदार धरून झालेल्या व होणाऱ्या कोविड मृत्यू साठी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. (Corona vaccine)
जिल्ह्यातील नियमित लसिकरणाचा (vaccination) साठा व्यवस्थित ठेवणे, ज्या ठिकाणी लस साठा ठेवण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी सर्व साहित्य व उपकरणे सुस्थितित काम करत आहेत याची खातरजमा करणे हे माता बाल संगोपन अधिकारी यांचे एक महत्वाचे काम आहे. विजे अभावी अथवा उपकरणे बंद पडून शीतसाखळी बंद पडून लस साठा खराब होणे या बाबी सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र व सर्वदूर होत आहेत. अश्या वेळी तत्काल लस साठा इतरत्र हलविणे, जबाबदार कर्मचारी यांचेवर कारवाई करणे याबाबत डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे कोणतीही कारवाई करत नाहीत. प्रा. आ. केंद्र-आलेगाव, ता. माढा येथे एप्रिल २०२२ मध्ये लाखों रुपयांची लस शीत साखळी उपकरणे बंद पडल्याने खराब झाली आहे. सदर बाबीची उच्च स्तरीय तपासणी करून डॉ. पिंपळे यांच्यावर तत्काळ कारवाई होणे आवश्यक होते. परंतु डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे व सध्या निलंबित असलेले तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव यांनी या प्रकरणी जा.क्र.जिपसो/आरोग्य/आरसीएच/२२४/२०२२, आरोग्य विभाग सोलापूर; दि.११.०७.२०२२ नुसार एक क्षुल्लक चौकशी समिति नेमली. सदर समितिमध्ये जिल्हा स्तरीय अधिकारी यांचा समावेश न करता सोयीच्या लोकांकडून चौकशी करून घेतली. व शीत साखळी उपकरणे देखभाल करणारे कर्मचारी यांचेकडून पैसे घेवून, सदर संपूर्ण जबाबदारी त्यांची असतानाही, तांत्रिक बिघाड मुळे उपकरणे बंद पडली असे कारण नमूद करून तसा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेतला व संबंधीत प्रकरण बंद केले आहे. तरी या लस साठा खराब होण्याला जबाबदार असणाऱ्या डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी केली आहे. (Corona vaccine)
हे ही वाचा
Service | कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केलेल्या नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा
Corruption of Recruitment | नोकर भरतीतील पेपर फोडण्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार