प्रतिनिधी : सोलापूर
गुरूनानक चौक येथील जिल्हा रूग्णालयातील पिडीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने न्याय मागण्यासाठी सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी नाहक त्रास देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रारी अर्ज येथे दाखल केला. यावेळी सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेणाऱ्या एका कॉन्स्टेबलने तक्रारी अर्जातील आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र तक्रारी अर्जातील इतर ठराविक अधिकाऱ्यांची नावे त्यांनी वगळली. सदरची नावे देखील या गुन्ह्यात घ्या, त्यांच्याविषयीही माझी तक्रार आहे, असे पिडीत महिलेने संबंधीत कॉन्स्टेबल यांना सांगितले. तरीही त्यांनी सदरची नावे अदखलपात्र गुन्ह्यात घेतली नाहीत, अशी माहिती पिडीत महिलेने माध्यमांना दिली. त्यामुळे याप्रकाराबाबत सदरची पिडीत महिला ही कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे धाव घेणार असुन पोलिस आयुक्तांनी न्याय देण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा राज्यात “Women In Leadership Roles”मध्ये…
गुरूनानक चौक येथील जिल्हा रूग्णालयातील पिडीत कंत्राटी महिलेने येथील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल 24 मार्च 2025 रोजी सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रारी अर्ज दिला. त्यावर पोलिसांनी 29 एप्रिल 2025 रोजी सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. परंतु सदरच्या पिडीत महिलेने तक्रारी अर्जात डॉ. राखी सुहास माने आणि असिस्टंट मेट्रन विजयमाला बेले यांच्याबरोबर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास दत्तात्रय माने, कंत्राटी जिल्हा लेखाव्यवस्थापक वैशाली शिवाजीराव थोरात आणि निवासी वैदयकिय अधिकारी (बाहय संपर्क) डॉ. श्रीकांत पी. कुलकर्णी यांची नावे तक्रारीत नमुद केली आहेत. परंतु यातील फक्त दोन महिला अधिकाऱ्यांची नावे अदखलपात्र गुन्ह्यात असून इतरांना अभय का देण्यात आले आहे ? असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा पूर्वी वादग्रस्त ठरलेले CS डॉ. सुहास माने अडचणीत येण्याची शक्यता
पिडीत कंत्राटी महिलेने लेखी तक्रारीत या सर्वांनी मिळून कामाच्या सार्वजनिक ठिकाणी बदनामी करून चारित्र्य हनन करणे, कंत्राटी असल्याने वेगळी वागणुक देणे, कामात नेहमी अडथळा निर्माण करणे, विजयमाला बेले यांच्याकडून कंत्राटी आणि नियमित पदाचा प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित करून नेहमी त्रास देणे, नाहक आणि खोट्या पध्दतीने चारित्र्यहनन करून बदनामी करणे, नैतीक/मानसिक अधःपतन करणे, डॉ. राखी सुहास माने यांच्याकडून रात्री उशीरा व्हॉट्सअप कॉल करून दम भरणे आणि अपशब्द वापरून माझा व माझ्या घरच्यांचा अवमान करणे, सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांच्याकडून महापालिकेच्या त्यांच्या कक्षात बोलावून दमदाटी करणे, त्यांची आस्थापना महापालिकेत असताना त्यांच्याकडून जिल्हा रूग्णालयातील मेट्रन कक्षामध्ये येऊन व विजयमाला बेले यांच्यासोबत कॅमेरा नसलेल्या रूममध्ये घेवून दमदाटी करणे, चारित्र्यावर घाणेरडे आरोप करून नैतीक अधःपतन करणे, संपुर्ण जिल्हा रूग्णालयात नाहक बदनामी करणे, संपुर्ण जिल्हा रूग्णालयातील स्टॉफ व उपस्थित पेशंट यांच्यासमोर डॉ. राखी सुहास माने आणि विजयमाला बेले यांच्याकडून चारित्र्य हनन करणे, कामावरून काढूण टाकण्याची धमकी देणे आदी त्रासांबद्दल लेखी तक्रारीमध्ये पिडीत महिलेने न्याय मागितला आहे. परंतु यातील ठराविक अधिकाऱ्यांची अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांनी नावे घेतली आहेत, तर इतरांची नावे का वगळली आहेत ? दखलपात्र गुन्हा नोंद होत असताना अदखलपात्र गुन्हा का दाखल केला आहे ? असा प्रश्न आरोग्य विभागात चर्चिला जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची आणि पिडीत महिलेस न्याय देण्याची मागणी कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून केली जात आहे.
हे ही वाचा अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार
डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”