चौकशी अधिकाऱ्यांची भुमिका संशयाच्या भोवऱ्यात
सोलापूर : प्रतिनिधी
Inquiry : एन. एच. एम (National Health Mission) आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कॉम्प्युटर ऑपरेटर नागेश चौधरी यांना कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केले होते. असे असताना पुन्हा चौधरी यांना गैरप्रकारे सेवेत सामावून घेतले आहे. त्यामुळे नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा, अशी तक्रारी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लालू पटेल यांनी केली होती. या अनुषंगाने चौकशी (Inquiry) समिती नेमली आहे. परंतु चौकशी समितीला नागेश चौधरींच्या चौकशीसाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे चौकशी अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक (अतां) सुभाष बोरकर यांची भुमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
हे ही वाचा अखेर DPM पदी डॉ. विलास सरवदे
नागेश चौधरी यांच्या विरोधातील तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, एन. एच. एम आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कॉम्प्युटर ऑपरेटर नागेश चौधरी यांच्या विरोधात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्याकडे अनेक लेखी व तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावित कलेल्या नस्तीनुसार 4 जुलै 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश चौधरी यांना सेवेतुन कार्यमुक्त केले होते.
नागेश चौधरी हे सेवेत असताना फाईल गहाळ करणे, दस्तावेजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे, नस्तीमधील नोटींगकरीता दिशाभुल सल्ला देणे, वरीष्ठ अधिकारी यांच्याशी उच्च आवाजात व आरेरावीची भाषेमध्ये बोलणे, कार्यालयातील महत्वाच्या बावी व माहीतीचे फोटो, झेरॉक्स काढून त्रयस्त व्यक्तीस देणे आदी प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या चुका नागेश चौधरी यांच्या मार्फत झालेल्या आहेत. या सर्व प्रकरणामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रस्तावित कलेल्या नस्तीनुसार 4 जुलै 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश चौधरी यांना सेवेतुन कार्यमुक्त केले होते. मात्र काही कालावधी नंतर नागेश चौधरी यांनी झालेल्या चुकांचा स्वीकार करुन व माफीनामा लिहुन दिल्यानंतर त्यांना परत कामावर घेण्यात आले. Inquiry
हे ही वाचा Health Minister | आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”
वास्तविक पाहता नागेश चौधरी यांच्या विरोधात गंभीर आरोप असताना परत कामावर कसे काय घेण्यात आले ? शासनामध्ये काम करून शासकीय फाईल गहाळ करणे, दस्तऐवजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे अशा गंभीर चुका करणाऱ्या व्यक्तीच्या हातुन भविष्यात शासनाचे आर्थिक नुकसान किंवा आर्थिक गैरव्यवहार अथवा इतर कर्मचा-यांच्या फाईलमध्ये फेरफार करुन नुकसान करण्याची शक्यता आहे. तसेच नागेश चौधरी हे कामावर असताना जि. प. सदस्य, राजकिय पदाधिकारी यांच्यामार्फत अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असतात. हे ही त्यांनी मान्य केलेले आहे. त्याचबरोबर नागेश चौधरी हे कार्यालयीन वेळेत सतत वैयक्तीक कामे करित असताना दिसतात. नागेश चौधरी हे जिल्हा लेखा व्यवस्थापक कक्षाकडे काम करीत असल्याने व करोडो रुपयांचा निधी असल्याने आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागेश चौधरी यांना सेवेतुन तत्काळ कमी करावे. तसेच सदरील प्रकरणात न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लालू पटेल यांनी दिला आहे. Inquiry
हे ही वाचा China vs India and Nepal | नेपाळच्या पंतप्रधानांनी केला चीन दौरा
दुसरीकडे सदरच्या तक्रारीस 2 वर्षे होत आली असताना चौधरी यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. चौकशी समिती नेमली असून यासंबंधीत चौकशी समितीमधील राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक (अतां) सुभाष बोरकर यांच्याकडून “तारीख पे तारीख” देऊन चौकशीस दिरंगाई केली जात आहे. तत्पूर्वी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी तथा चौकशी अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी चौकशीचे पत्र काढले होते. त्यानंतर बोरकर यांनी 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी चौकशी करण्यासाठी येत असल्याचे कळवले होते. परंतु सदरची चौकशी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 24 मे 2023 रोजी चौकशी करण्यात येईल असे पत्र पाठवले होते, परंतु यावेळीही चौकशीसाठी पुढील तारीख कळवली जाईल असे पत्र पाठवत पुन्हा चौकशी पुढे ढकलली. 5 एप्रिल 2021 रोजीच्या तक्रारीवर जुन 2023 उजाडले तरी चौकशी करून अहवाल सादर करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक (अतां) सुभाष बोरकर यांच्या भूमिकेवर जि. प. आरोग्य विभागातूनच संशय व्यक्त केला जात असून चौकशी अधिकारी बदलून तत्काळ चौकशी पूर्ण करण्याची मागणी होत आहे. यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त धीरज कुमार हे काय निर्णय घेतील ? याकडे लक्ष लागले आहे. Inquiry
जिल्हा लेखा व्यवस्थापकांचा खोटारडेपणा उघड
नागेश चौधरींची मुळ नियुक्ती वैद्यकीय महाविद्यालयात असताना ते जि. प. आरोग्य विभागात कार्यरत आहेत, याबाबत प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना विचारणा करण्यात आली. यावेळी डॉ. बागडे यांनी कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांना बोलावून चौधरी यांच्या नियुक्तीबाबत विचारणा केली. यावर थोरात यांनी चौधरींची नियुक्ती पूर्वीपासुन जि. प. आरोग्य विभागातच असल्याचे डॉ. बागडे यांना सांगितले. परंतु चौधरींच्या नियुक्तीचे पत्र “सत्ताकारण”च्या हाती लागले असून जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. तसेच त्या चक्क जिल्हा आरोग्य अधिकारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. Inquiry