सत्ताकारण न्युज नेटवर्क
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय चहा. आपण दिवसाची सुरुवात चहानेच करतो. परंतु तुम्ही चहा ऐवजी जर Lemon Tea चे सेवन केले, तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लेमन टी मध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई, थायामिन, नियासिन यांसारखे शरीराला पोषक असणारे घटक आढळतात. यामुळे तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता. तर जाणून घेऊया आपन लेमन टी चे काही आरोग्यदायी फायदे (Lemon Tea Benefits)…
Lemon Tea मुळे वजन नियंत्रणात राहते
तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल, तर दररोज लेमन टी चे सेवन करा. शरीर डिटॉक्स करण्यासाठी याची खुप मदत होते. लिंबूमध्ये असलेले गुणधर्म आपली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच लेमन टीमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासही मदत करतात.
Lemon Tea सर्दीसाठी उपयुक्त
सर्दी असणाऱ्या व्यक्तींनी लेमन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. लेमन टीमध्ये आलं टाकून दिवसातून 3 ते 4 वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. घशात खवखव होत असेल तर यामुळे ती दुर होते. लेमन टी मध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजारही बरे होतात.
Lemon Tea मुळे पचन तंत्र सुधारते
लेमन टी पिल्याने पचन तंत्र सुधारण्यास मदत होते. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकांना अॅसिडिटीची त्रास होत असतो. यामुळे अशा लोकांनी अॅसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लेमन टी चे सेवन करणे कधीही उत्तम.
Lemon Tea त्वचेसाठी फायदेशीर
लेमन टी पिल्याने आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. विशेषत: यामुळे त्वचेवरील मुरुम आणि सुरकुत्याची समस्या दूर होण्यास मदत होते. लेमन टी मध्ये मध आणि साखर मिश्रित करून दररोज प्यायल्याने चेहरा तजेलदार दिसू शकतो.
Lemon Tea मुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते
लेमन टी मध्ये व्हिटॅमिन सी सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत. ज्याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये असलेल्या फ्लेव्होनोइड्स आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे इम्युनिटी वाढवण्यासही मदत होते.
हे ही वाचा तुम्हाला Dark Chocolate आवडते ? जाणून घ्या Chocolate खाण्याचे फायदे…
MD Drugs | सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त