सोलापूर : प्रतिनिधी
येथील महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गेल्या महिन्यात संपन्न झाले. त्यानंतर येथे रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यास सुरवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला व नवजात शिशु रुग्णालयात मंगळवारी, 23 एप्रिल रोजी पहिली शस्त्रक्रीया (सिझेरियन) झाली. परिणामी यावेळी पहिली शस्त्रक्रीया (सिझेरियन) होवून प्रसूत झालेल्या प्रथम रूग्ण असलेल्या आईचे व प्रथम जन्मलेल्या नवजात कन्येचे स्वागत मंगळवारी, 23 एप्रिल रोजी थाटात करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
सोलापूर येथे गुरुनानक चौकात 13 मार्च 2024 रोजी महिला व नवजात शिशुंसाठी नवीन शासकीय रुग्णालय सुरु केले आहे. येथे गरोदर मातांची तपासणी, प्रसुती, शस्त्रक्रिया व नवजात बालकांची देखभाल करण्यात येते. त्यासाठी लागणारी सर्व अद्ययावत यंत्रसामुग्री, शस्त्रक्रिया कक्ष नव्याने सुरु करण्यात आले आहे. पहिली शस्त्रक्रिया (सिझेरियन) शरयु दीपक सुरवसे, मु. पो. जवळगा, ता. सिंधी, जि. लातूर यांच्यावर 15 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यानंतर प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत करुन त्यांना शासकीय वाहनातून मंगळवारी, 23 एप्रिल रोजी सुखरुप घरी पाठवण्यात.
हे ही वाचा जिल्हा रूग्णालयातील “हिमोफिलिया डे केअर सेंटर”चा लाभ रुग्णांनी घ्यावा
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षिरसागर, वैद्यकीय अधिक्षक जयश्री ढवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, स्रीरोग तज्ञ डॉ. आशा घोडके, बालरोग तज्ञ डॉ. मुकुंद माने, दंतरोग तज्ञ डॉ. वायचळ, अधिसेविका दीपाली काळे, परिसेविका शितल ओहाळ, शुभांगी पडवळ यांच्यासह अन्य कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
गरीब व गरजू रूग्णांनी येथील रूग्णसेवेचा लाभ घ्यावा
महिला व नवजात शिशुंसाठी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, औषधोपचार उपलब्ध आहेत. तरी गरीब व गरजू रूग्णांनी येथील रूग्णसेवेचा लाभ घ्यावा.
– डॉ. जयश्री ढवळे, वैद्यकीय अधिक्षक, महिला व नवजात शिशु रुग्णालय सोलापूर.
उत्तम व दर्जेदार रूग्णसेवा
येथील डॉक्टर, सर्व कर्मचारी यांच्याकडून अतिशय उत्तम व दर्जेदार रूग्णसेवा मिळाली. येथील उपचार पाहूण आम्ही जणू खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय का, असे वाटत होते. सर्वसामान्य नागरिकांनी येथील रूग्णसेवेचा लाभ घ्यावा.
– शारदा सुरवसे, जवळगा (सिंधी, ता. निलंगा, जि. लातूर), रुग्णाचे नातेवाईक.
हे ही वाचा चुकीच्या आदेशान्वये डॉ. एस. पी. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात ठाण मांडून
आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड