सोलापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यात 38 जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय 5 मार्च 2024 रोजी जारी केला. यामध्ये सोलापूर येथील जिल्हा परिषद, आरोग्य विभागात धनंजय मधुकर वाळा यांची नियुक्ती करणयात आली होती. त्यानुसार नवनियुक्त जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदी धनंजय वाळा हे नुकतेच रूजू झाले.
हे ही वाचा वित्तीय अनियमिततेत बिलिंग सेक्शन क्लार्कला उपसंचालकांकडून अभय ?
सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी वाळा हे गेल्या 25 वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत होते. बुधवारी, 20 मार्च रोजी त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. मोहन शेगर, डॉ. विलास सरवदे, आरोग्य सेवक रफिक शेख आदी उपस्थित होते.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण