सोलापूर : प्रतिनिधी
मणिपूर (Manipur Violence News) येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि वीज दरवाढ कमी करावी, सेतू सुविधा केंद्रात दाखले त्वरित मिळावेत, वक्फ बोर्ड कडक करावा आदी विविध मागण्यांसाठी एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष फारूख शाब्दी म्हणाले, मणिपूर येथे झालेली घटना निंदनीय आहे. त्याचा निषेध करतो. येथे भाजपची सत्ता असून दोन महिन्यांपासून दोन समाजात दंगली सुरू आहेत. तातडीने हे सर्व थांबले पाहिजे. महिला विषयीची घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर वक्फ बोर्डाचा कायदा कडक करा, दाखले वेळेत द्या, अशा विविध मागण्या एमआयएमचे शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांनी केल्या.
भाजपची सत्ता असलेल्या मणिपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपूर्ण प्रदेशात दंगे घडवून लोकांची घरे उध्वस्त करण्याचे काम काही जातीवादी शक्ती करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने दंगलग्रस्त लोकांचे पुनर्वसन करावे, समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी एमआयएमच्यावतीने निदर्शने करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे फलक महिलांनी हाती घेतले होते.
यावेळी आंदोलनात नसिम खलीफा, गाझी जहागीरदार, वाहेदा भंडाले, कोमारो सय्यद, रियाज सय्यद, सचिन कोलते, एजाज बागवान, मोहसिन मैंदर्गीकर, अब्दुभाई शेख, इसामोद्दीन पिरजादे, हारीस कुरेशी, शोहेब चौधरी, राजा बागवान, सलमा सय्यद, अब्दुरहेमान मोहोळकर, इम्रान पठान, इम्रान हवालदार, अझहर कोरबू, इक्बाल पठाण, इरफान भाई अत्तारी, अझहर शेख, अझहर जहागीरदार, मुन्ना शेख, जहीर सय्यद, असिफ जमादार, नुरजहा मकानदार, अब्दुल शेख, बंडुभाऊ जाधव, नसिमा कुरेशी, अनिसा मोगल, अनिसा डोका, जुबेर शेख यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिवाल्वर जवळ ठेवण्याची परवानगी द्या
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुली नाहीत. महिलांच्या समस्या दुःख तुम्हाला कधी कळणार, असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला आता रिवाल्वर जवळ ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी यावेळी महीलांच्यावतीने करण्यात आली.
हे ही वाचा
Ganapath Movie Teaser | टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉन च्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज
अखेर Jio AirFiber लाँच; 599 रुपयांत मिळणार ‘या’ शहरांना हायस्पीड इंटरनेट सेवा