टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन च्या Ganapath Movie Teaser नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या या टीझरमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची जबरदस्त अॅक्शन आणि अमिताभ बच्चनचा वेगळा लूक पाहायला मिळणार आहे.
Ganapath Movie 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित
बॉलिवूड इंडस्ट्रीचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित ‘गणपत’ चित्रपट येत्या 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आवडता अभिनेता टायगर श्रॉफच्या चित्रपटाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. टायगर श्रॉफच्या Ganapath Movie Teaser पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित झाल्याचे पहायला मिळते. चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची अॅक्शन आवडली असल्याचे दिसून येते. यापूर्वी टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’ 2022 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर दिसला नाही, त्यामुळे त्याच्या चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत होते.
अमिताभ बच्चन यांच्या लूकने सर्वांचे वेधले लक्ष
Ganapath Movie Teaser मध्ये टायगर श्रॉफशिवाय क्रिती सेनॉनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळेल. दुसरीकडे या चित्रपटाच्या टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंडमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज चाहत्यांना अवाक करत आहे. आता टायगर श्रॉफचा ‘गणपत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल याने केले आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
“गणपत” चित्रपटातील कलाकार : टायगर श्रॉफ, अमिताभ बच्चन, क्रिती सेनॉन, ईलाई अवराम आदी.
गणपत चित्रपटाचे बजेट : गणपथ चित्रपटाचे बजेट हे 200 कोटी रूपये आहे.
दिग्दर्शक : विकास बहल.
निर्माता : विकास बहल, जॅकी भगनानी, वाशु भगनानी आणि दिपशिखा देशमुखा
प्रदर्शित : 20 ऑक्टोबर 2023
प्रोडक्शन कंपनी : Good Company आणि Pooja Entertainment
डिस्ट्रीब्युशन : PVR Inox Picture
हे ही वाचा
आजचे राशीभविष्य, 1 ऑक्टोबर 2023 | Today Horoscope
Mission Raniganj Trailer | ‘मिशन राणीगंज’चा थरारक ट्रेलर लाँच