Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले राशी भविष्य (Today Horoscope). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष रास : खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
मेष राशीतील व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असेल. एखादी नवीन संधी चालून येऊ शकते, ज्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. पैशांच्या बाबत अडचण जाणवणार. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहू शकता.
शुभ अंक- 5
शुभ रंग- निळा
—————————————————————
वृषभ रास : प्रिय व्यक्तीशी आदराने वागा
खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास आज मदत होईल. कामात गडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे. प्रिय व्यक्तीशी आदराने वागावे. आई-वडिलांची नेहमीसारखी साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागावे लागणार.
शुभ अंक- 2
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
मिथुन रास : आजचा दिवस उत्साहात जाणार
या राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळणार. आजचा दिवस उत्साहात जाणार. मित्रपरिवारासह बाहेर फिरायला जाता येईल.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
—————————————————————
कर्क रास : प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळावे
मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होणार. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नये. आजच्या दिवशी प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळावे. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नये.
शुभ अंक- 6
शुभ रंग- पिवळा
—————————————————————
सिंह रास : घरातील व्यक्तिंशी वाद होण्याची शक्यता
आजच्या दिवशी घरातील व्यक्तिंशी वाद होण्याची शक्यता. प्रकृती बिघडेल परंतु त्याकडे वेळीच लक्ष द्या. नेहमीप्रमाणे आजही आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणी कामे संयमाने पूर्ण करावी लागणार. कामात नकळत चुका होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी हमखास मिळेल.
शुभ अंक- 7
शुभ रंग- लाल
—————————————————————
कन्या रास : आर्थिकदृष्ट्या लाभ होणार
या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभ होणार. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक आणि नवीन संधी चालून येईल. प्रिय व्यक्ती तुमच्या वागण्यामुळे नाखुश असेल. जवळच्या व्यक्तीशी भांडणे टाळा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- जांभळा
—————————————————————
तुळ रास : रागावर नियंत्रण ठेवा
घरात भांडणे होण्याची दाट शक्यता. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोला. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढावा लागेल. वारंवार कपड्यांवर खर्च करणे टाळावे.
शुभ अंक- 7
शुभ रंग- सोनेरी
—————————————————————
वृश्चिक रास : वाहन जपून चालवा
या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा जाणार. कामात यश मिळून कौतुक होईल. आज एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करता येईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होवू शकतो. आज वाहन जपून चालवावे.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पिवळा
—————————————————————
धनु रास : खर्चाचे योग्य नियोजन करा
या राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. खर्चाचे योग्य नियोजन करून त्यानुसार खर्च करावा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे योग्य फळ मिळण्याची दाट शक्यता. घरात एखादी नवीन गोष्ट येणार. Today Horoscope
शुभ अंक- 1
शुभ रंग- करडा
—————————————————————
मकर रास : पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावे
या राशीतील व्यक्तींनी पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावे. आज नोकरी-व्यवसायातील अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. दिवस धावपळीचा असला तरी संध्याकाळी सुखद धक्का मिळू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा आज पूर्ण होतील. Today Horoscope
शुभ अंक- 5
शुभ रंग- केशरी
—————————————————————
कुंभ रास : नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करावी
या राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे नक्की पूर्ण करता येणार. घरातील मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे. गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नये. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करावी लागतील. Today Horoscope
शुभ अंक- 2
शुभ रंग- आकाशी
—————————————————————
मीन रास : रखडलेली कामे आज पूर्ण होतील
आजचा दिवस उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील व्यक्तिंना वेळ द्यावा. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील.
शुभ अंक- 6
शुभ रंग- गुलाबी
Today Horoscope
हे ही वाचा
आजचे राशीभविष्य, 1 ऑक्टोबर 2023 | Today Horoscope
Ganapath Movie Teaser | टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉन च्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज