पुणे : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागात तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत जेवढे चर्चेत राहिले. त्यापेक्षा जास्त चर्चा डॉ. राधाकिशन पवार यांची झाली. त्यांच्या कार्यकाळात आयुक्तांचे निर्णय स्वतः उपसंचालकांकडे घेण्यासाठी थेट शासन निर्णय बदलणे, भरती घोटाळे, बदल्या-प्रतिनियुक्त्यांमध्ये वसुली, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि खा. संजय राऊत यांच्याकडून टक्केवारी वसुलीचा आरोप, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय, 297 कोटींच्या औषध घोटाळ्यात निलंबीत आदी कारणांमुळे डॉ. राधाकिशन पवार यांच्याविरोधात मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये खालच्या स्तरावर जाऊन कर्मचाऱ्यांना घोषणाबाजी करावी लागली. एवढा संताप सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पसरला होता. परंतु अखेर डॉ. राधाकिशन पवार यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी झाली आहे. तसेच डॉ. बबिता कमलापुरकर यांचीही हकालपट्टी झाली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. राधाकिशन पवार हे उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथे कार्यरत होते. या पदावरून त्यांची प्रशासकीय बदली ही उपसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे येथे करण्यात आली आहे. तर डॉ. बबिता कमलापुरकर यांची सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे या पदावरून उपसंचालक, आरोग्य सेवा (आमाजिआ) पुणे या पदावर प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. सदरचे आदेश अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी पारित केले आहेत.
आरोग्य मंत्र्यांनी खालील गोष्टींचा विचार करून संबंधीतांना निलंबीत करण्याची गरज
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
समावेशनाच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 45 ते 50 कोटींची वसुली
ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने 75 कोटींची वसुली
हायटेक आषाढी वारीच्या नावाखाली छपाई आणि प्रसिध्दीसाठी नाहक हायटेक खर्च
आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या चष्म्यांचे सोलापूरातील आरोग्य शिबिरात वाटप
297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांकडून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय
आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड