प्रतिनिधी : सोलापूर
सोलापूर महापालिकेतील विविध कार्यालयात नागरीकांची विविध कामे असतात. या विविध कामांसाठी शासकीय अधिकारी-कर्मचारी, एजंट, खासगी व्यक्ती आदींकडून पैशाची मागणी केल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा. संबंधीतावर प्रशासकीय किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
हे ही वाचा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अपात्र मक्तेदारांना पात्र करून दिले ड्रेनेज लाईन कामांचे टेंडर
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महापालिकेत सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे ते म्हणाले की, मी कोणत्याही मार्गाने किंवा कोणामार्फतही पैसे घेत नाही. माझ्या नावे कोणी पैसे मागत असेल तरीही तक्रार दाखल करावी. तसेच महापालिकेकडून प्रशासकीय व इतर अन्य कामाचया अडीअडचणीबाबत ऑनलाईन ॲप कार्यान्वित केले असून त्यामध्ये परिवर्तन ॲप, आपले सरकार या ॲपवर तक्रारी नोंदवण्यात याव्यात. तसेच फक्त भ्रष्टाचारा संबंधी तक्रारीसाठी commissioner.solapurms@gmail.com या ई-मेल वर तक्रारी पाठवाव्यात. आणि हा ई-मेल आयडी स्वतः आयुक्त डॉ. ओम्बासे हाताळणार आहेत. त्यामुळे नागरीकांना आता थेट आयुक्तांकडे लेखी तक्रारी दाखल करता येणार आहेत. यामुळे भ्रष्टाचारास आळा बसून प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.
हे ही वाचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार
या पत्रकार परिषदेवेळी बांधकाम विभागामार्फत 5 ते 10 वर्षात दिलेल्या परवानग्या आणि वापर परवाने तपासणी, त्यामध्ये दोषी आढळल्यास दंडात्मक किंवा योग्य ती कारवाई, अनधिकृत पार्किंग, रस्त्यालगतचे अतिक्रमण आदी बाबत कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त रवि पवार उपस्थित होते.
हे ही वाचा शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या
फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजेंवर गुन्हा दाखल