सोलापूर : प्रतिनिधी
दुचाकी विक्रेत्याकडून जुनी चारचारी गाडी घेतली, परंतु त्या विक्रेत्याला त्याचे उर्वरीत पैसे न देता उलट त्याला दमदाटी केली. परिणामी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे आणि त्यांच्या एका साथीदारावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हे ही वाचा औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकींना औषध भांडार प्रमुख पदावरून हटवा
घडलेली घटना अशी की, फिर्यादी विठ्ठल दत्तात्रय मुनगापाटील, (वय ३९ वर्षे, रा-१३८, सृष्टी नगर अक्कलकोट रोड, सोलापूर) यांचा जुन्या चारचाकी गाडी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी हे पुणे-मुंबई येथून चारचाकी गाड्या विकत आणून त्या सोलापूर शहरात विकतात. दरम्यान 4 जानेवारी 2024 रोजी ते आजतागायत पर्यंत फिर्यादी मुनगापाटील यांच्याकडे फिर्यादीचे ओळखीचे आकाश मुदगल यांनी फिर्यादीस मनिष काळजे यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे, असे सांगितले. यावर फिर्यादी मुनगापाटील यांनी त्यांच्या जवळील चारचाकी गाडी (MH 04 FN 7878) मनिष काळजे आणि आकाश मुदगल यांना दाखवली. यावेळी मनिष काळजे यांनी सदरची गाडी पसंद आहे, असे सांगून 4 लाख रूपये ला गाडीचा सौदा केला. त्यानंतर आरोपी काळजे यांनी सदर ठरलेल्या सौदयापैकी 1 लाख रूपये हे अॅडव्हान्स म्हणून दिले. तर उरलेले पैसे 2 दिवसात देतो असे म्हणनू फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेवून ते वाहन स्वतःचे आहे म्हणून वापरत आहेत. मात्र फिर्यादी मुनगापाटील यांची आर्थिक फसवणुक करून दमदाटी केली आहे. त्यामुळे फिर्यादी मुनगापाटील यांनी आर्थिक फसवणुक करून दमदाटी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे आणि आकाश मुदगल यांच्यावर 21 फेबु्रवारी 2024 रोजी कलम 420, 406, 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि कुकडे करत आहेत.
हे ही वाचा भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात