महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे महापालिका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष किरण बनसोडे यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, जेष्ठ पत्रकार प्रशांत माने आणि मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस वसीम अत्तार.
सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका पत्रकार संघाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध प्रश्न विकासाच्या (Development) मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात येईल. शहराच्या विकासासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न नुतन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष किरण बनसोडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने रविवारी महापालिका पत्रकार संघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, जेष्ठ पत्रकार तथा सल्लागार प्रशांत माने, महापालिका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष किरण बनसोडे, मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस वसीम अत्तार आदी उपस्थित होते. Development
हे ही वाचा Ganapath Movie Teaser | टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉन च्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत म्हणाले, सोलापूर शहराला उत्सवाचे शहर म्हणून ओळखले जाते. सर्व सण-उत्सवाच्या निमित्ताने सोलापूरकर लाखोंच्या संख्येने एकत्र येतात. मात्र विकासाच्या मुद्द्यावर मागे का ? असा प्रश्न उपस्थित करत बोरामणी विमानतळासह विकासाच्या मुद्द्यावर सोलापूरकरांनी आता एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. Development
हे ही वाचा Corruption of Recruitment | नोकर भरतीतील पेपर फोडण्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार
पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी शिबिर, त्याचबरोबर इतर उपक्रम राबवावेत, अशी सूचना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने यांनी यावेळी केली. याप्रसंगी महापालिका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख, चिटणीस रोहन श्रीराम, विशाल भांगे, कार्यकारणी सदस्य आप्पासाहेब पाटील, जाकीर हुसेन पिरजादे, अभिषेक आदेप्पा, अयुब कागदी आदींसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सागर सुरवसे, मनोज हुलसुरे, आप्पा बनसोडे, विजय बाबर, रणजीत वाघमारे, विनोद हुमनाबादकर, रवी ढोबळे, अंबादास पोळ, तौसिफ शेख, अशोक कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वसीम अत्तार यांनी केले. आभार अय्युब कागदी यांनी मानले. Development
हे ही वाचा K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा