भाग 7 : रणजित वाघमारे
“शंभर खोके एकदम ओके” असा करेक्ट कार्यक्रम करून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्याचे विरोधकांनी ठणकावून सांगितले. शपथविधीत एकनाथ शिंदेंना चक्क “मुख्यमंत्री” पदाची लॉटरी लागली. त्यानंतर अनेकांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडायला लागली असून ती सत्यात उतरवण्यासाठी अनेकांनी उद्योग सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागात बीडच्या भुमीपुत्राने “आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा” असा Sweet Msg पाठवून वसुली सुरू केली होती. याची पोलखोल “सत्ताकारण”ने केल्यानंतर “भावी CM” सर्वांना कळाले, परंतु यामुळे पुणे विभागातील वसुलीचा कार्यक्रम बारगळला. मात्र त्याला आता महिना उलटत नाही, तोपर्यंत बीडच्या भुमीपुत्राने “आरोग्य मंत्र्यांना CM करण्यासाठी पुन्हा वसुलदारांची वारी विदर्भाच्या दारी” हा कार्यक्रम राबवला आहे.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी सुहास माने
आरोग्य मंत्र्यांना CM करण्यासाठी आरोग्य विभागातील स्वयंघोषीत वसुलदारांची टोळी स्वतःहून वसुलीसाठी सक्रीय झाली आहे. त्यासाठी सध्या त्यांनी पुणे विभागाला बगल देत हा कार्यक्रम थेट विदर्थात सुरू केला आहे. परिणामी बीडच्या भुमीपुत्राने विदर्भात “मलेरिया”च्या आढळलेल्या केसेसच्या निमित्ताने आढावा बैठक घेतली. यामध्ये बैठकीनंतरचा फार्स म्हणून नागपूर विभागातील सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पुणे विभागासारखाच “Sweet Msg” दिला आहे. याची अत्यंत गोपनीयता ठेण्यात आली असली तरी तेथील काही वैद्यकीय अधिक्षक आणि काही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी “सत्ताकारण”शी संपर्क करत सदरची बाब निदर्शनास आणून दिली.
हे ही वाचा आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या चष्म्यांचे सोलापूरातील आरोग्य शिबिरात वाटप
त्यामुळे आता आरोग्य मंत्र्यांना CM करण्याचे वारे विदर्भातून वाहत असून यासाठी तेथील त्या-त्या विभागातील उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. यातील स्वयंघोषीत वसुलदारांची बैठक नागपूर मधील शासकीय प्रशिक्षण केंद्राच्या व्हीआयपी रूम मध्ये झाली. त्यानंतर मात्र नावाला जिल्हा हिवताप कार्यालयातून चोरीला गेलेल्या 5 लाख रुपये किंमतीच्या “मायक्रोस्काप” यंत्र चोरीचे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आले. याप्रकरणात यापूर्वीच भांडारपाल अशोक पवार यांना निलंबीत करून त्यांच्यावर विभागीय चौकशीदेखील लावण्यात आली आहे. परंतु आता त्यांच्याबरोबर तेथील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही जाणीवपुर्वक गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
CM कडून “आरोग्य मंत्री” पदाच्या राजीनाम्याची मागणी
“आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे…” हा Msg आणि बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापर्यंत पोहचला आहे. परिणामी यावर CM कडून आरोग्य मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आरोग्य मंत्री पदाचा राजीनाम देण्यास तयार नाहीत, नसेल तर याबदल्यात त्यांनी “उच्च व तंत्र शिक्षण विभाग” देण्याची मागणी केली आहे. मात्र ते खाते भाजपा कडे असल्याने मुख्यमंत्र्यांनी तेही खाते देण्यास नकार दिला असल्याचे कात्रज कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा हायटेक आषाढी वारीच्या नावाखाली छपाई आणि प्रसिध्दीसाठी नाहक हायटेक खर्च
ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने 75 कोटींची वसुली
समावेशनाच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 45 ते 50 कोटींची वसुली