Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope In Marathi 22 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष : या राशींच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन आनंदी असेल. पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी देखील ग्रासू शकतील. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस समाधानाचा आहे. आजचा दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी उत्तम असणारा आहे.
—————————————————————
वृषभ : वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज मतभेद टाळा. वाद टाळणेही उपयुक्त ठरेल. आजचा दिवस नोकरी-धंद्याच्या दृष्टीने चांगला असेल. गुंतवणुकीची चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
—————————————————————
मिथुन : नोकरीसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायात तेजी आणि नोकरीत वृद्धी दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी चालून येईणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे आज दुर्लक्ष करू नका.
—————————————————————
कर्क : कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र त्यातून सकारात्मक निकाल हाती येणार. घेऊन जा. मानसिक संतुलन बिघडवू देऊ नका. शांत राहून कामे पूर्णत्वास न्या. कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत आहेत. आज शक्य असल्यास दूरचा प्रवास टाळावा.
—————————————————————
सिंह : या राशीच्या लोकांनी आज आपले स्वास्थ्य सांभाळावे. नोकरीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठाबरोबर वाद टाळावेत. आज धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख व शांती मिळवून देईल. आज तुमच्या खिशावरील ताण वाढणार असल्याने खर्च सांभाळून करा.
—————————————————————
कन्या : कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. उत्पन्नाची साधने आज वाढतील. आप्तांचा व नातेवाईकांचा आधार आज नक्की लाभेल. व्यवसायात वाढ दिसून येणार. मात्र आज आरोग्याच्या समस्या जाणवत असल्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.
—————————————————————
तुळ : या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आज तुम्ही सुखी, समाधानी व निरोगी राहाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरणार आहे. अनावश्यक खर्च करू टाळावेत. व्यवसायात वाढ दिसेल, मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
—————————————————————
वृश्चिक : आज कुटूंबातील वातावरण संतुलीत ठेवणे फायद्याचे ठरेल. वादविवाद, अनावश्यक चर्चा टाळाव्यात. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागणार. स्वास्थ्य विषयक काळज्या मिटण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा आज सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
—————————————————————
धनु : आज यश प्राप्तीसाठी अथक परिश्रम करावे लागतील. अनावश्यक प्रवास हितकारक ठरणार नसल्याने तो टाळावा. व्यवसायात उधारी देणे टाळावी. मनात नकारात्मक भावना येऊ शकतात. परिणामी महत्वाचे निर्णय घेऊ नये.
—————————————————————
मकर : आज आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याची गरज असेल. कर्ज घेणे टाळा. गुंतवणूक करताना सर्व दृष्टीकोनातून विचार करूनच गुंतवणूक करावी. कुटुंबीयांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करू शकता.
—————————————————————
कुंभ : आजचा दिवस आनंदी राहील. मनातील ऊर्जा व्यवसायात फलदायी ठरेल. आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नवीन काही सुरु करण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
—————————————————————
मीन : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार. आज कर्जांवरून देखील तुमचे वाद-विवाद होऊ शकतील. मोठी गुंतवणूक टाळणे बरे. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी संध्याकाळी मंदिरात देवाचे दर्शन नक्की घ्या.