मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse यांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. तसेच यामध्ये केवळ एकनाथ खडसेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse यांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस आली असून यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही नोटीस बजावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 19 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2023
मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. विधान परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना करून चौकशीचे आदेश दिले होते. परिणामी या प्रकरणाची चौकशी करून एसआयटीने शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांना ही 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे खडसे कुटूंबीय या प्रकरणी काय बोलणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा अखेर Drug Mafia Lalit Patil मुंबई पोलिसांच्या हाती
बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन घोटाळ्यात Eknath Khadse आणि त्यांच्या कुटूंबीयांवर कारवाई होणार आहे. SIT ची चौकशी पूर्ण झाली आहे. कारवाईला सुरुवात होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. कालच दावा केला आणि आज खडसेंना नोटीस मिळाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे आरोप खरा असल्यामुळेच SIT नियुक्त करून चौकशी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याचे पुरावे आहेत. माझा आरोप खरा असल्यामुळेच चौकशीसाठी SIT नियुक्त करण्यात आली होती. आता SIT ची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. लवकरच कारवाईबाबतचे पत्र आपल्या हातात पडणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली होती. त्याप्रमाणे सध्या घडत असल्याचे चित्र आहे.