Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope In Marathi 13 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष : या राशींच्या व्यक्तींच्या घरगुती जीवनात तणाव निर्माण होईल. व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक करणे टाळावे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक वादांकडे दुर्लक्ष करावे. आज कामाच्या ठिकाणी दक्ष रहावे.
शुभ अंक- 7
शुभ रंग- निळा
—————————————————————
वृषभ : या राशींच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. नोकरवर्गाला काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होणार. बेकायदेशीर प्रकरणांपासून आज दूर रहावे. आज गृहसौख्य लाभणार. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
शुभ अंक- 1
शुभ रंग- हिरवा
—————————————————————
मिथुन : आज प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आज पैसा कमी येईल. आज कर्ज घेणे टाळावे. व्यवसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला आज फायद्याचा ठरेल.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
कर्क : या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत घनिष्टता चांगली राहील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये आज समोरच्यावर विश्वास ठेऊ नये. आज कामाचा भार वाढेल.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पिवळा
—————————————————————
सिंह : या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नकारात्मक असेल. जोडीदारासोबत नाते आज उत्तम राहील. आर्थिक बाबी मार्गी लागण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करा, मात्र मोठे खर्च टाळा. स्वतःला अध्यात्मामध्ये गुंतवावे. आज दुरचा प्रवास टाळा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- केशरी
—————————————————————
कन्या : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अनेक बाबतीत काळजी घ्यावी लागणार. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता. आरोग्यही बिघडण्याचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत हात आखडता घ्यावा. नोकरीत जास्त समस्या भेडसावणार नाहीत.
शुभ अंक- 6
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
तुळ : या राशींच्या लोकांच्या कुटुंबात आज एकोपा राहील. यामुळे महत्वाचे कौटुंबिक निर्णय आज घेऊ शकता. नोकरीतील लोकांचे आयुष्य उत्तम आहे. अनपेक्षित खर्च करणे टाळावे. पैसे उसने देताना दक्ष राहावे. आज जोडीदारासोबत समजूतदारपणा दाखवा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- जांभळा
—————————————————————
वृश्चिक : या राशींच्या लोकांचा आजचा दिवस उत्तम आहे. आज जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात चढ-उतार येणार. मुलांच्या वर्तनामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता. आज आळसावर नियंत्रण ठेऊन स्वतःला कार्यरत ठेवावे. प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये.
शुभ अंक- 9
शुभ रंग- हिरवा
—————————————————————
धनु : आज कुटूंबातील व्यक्तींबरोबर भांडण होण्याची शक्यता. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. आज आर्थिक बाबी मार्गी लागणार. आज फसवणूक पासून स्वतःचे रक्षण करा. व्यवसायिकांनी आजच्या निर्णयांबद्दल खबरदारी घ्यावी. बेकायदेशीर प्रकरणांपासून दूर राहा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- लाल
—————————————————————
मकर : या राशींच्या लोकांच्या वैयक्तिक जीवनात समाधान मिळेल. डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता. आर्थिक आघाडीवर फायद होण्याची शक्यता आहे. नोकरीमार्फत काही मोठ्या संधी चालून येणार,ख मात्र कष्टासाठी तयार रहावे. आज अधिक चांगली नोकरी मिळेल. आज कर्ज घेणे टाळा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- निळा
—————————————————————
कुंभ : आज किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक जीवन सौख्याचे राहणार. जवळच्या मित्रांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. नोकरीत नाव होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. जोडीदार किंवा आई-वडिलांसोबत बोलताना काळजी घ्यावी.
शुभ अंक- 4
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
मीन : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कौटुंबिक स्थिती आशादायक आहे. आज काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे अत्यावश्यक आहे. आज घडलेली कोणतीही चूक पुढे नुकसानकारक ठरू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदारीत कोणतेही काम सुरु करू नये.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लाल
हे ही वाचा 5 तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
IAS CEO यांनी घेतले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून साडेतीन हजार रूपये