रणजित वाघमारे : सत्ताकारण न्युज नेटवर्क
IAS असलेल्या CEO यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून आईच्या उपचारादरम्यान चक्क साडेतीन हजार रूपये घेतल्याचे खुद्द यातील जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वत्र सांगत सुटले आहेत. त्यामुळे याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली होती. आता तीच चर्चा जिल्हा परिषदेनंतर शहर-जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत असून याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 11 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 11 ऑक्टोबर 2023
याबाबत घडलेली घटना अशी की, आपल्या राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांपैकी एका जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत IAS CEO आहेत. त्यांची आई आजारी असल्याने त्यांच्यावर एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी आईंच्या विविध तपासण्या करावयास सांगितल्या. परिणामी एका लॅबमध्ये त्या IAS CEO यांच्या आईला तपासणीसाठी घेऊन गेले असता तेथे तपासणीचे बिल साडेतीन हजार रूपये झाले. त्यासाठी संबंधीत त्या IAS CEO यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना साडेतीन हजार रूपये देण्यास सांगितले. त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केदारनाथाकडून सदरचे पैसे हनिफनाथाकडे पाठवल्याचे खुद्द यातील जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वांना सांगत सुटले आहेत.
या घटनेमुळे जिल्हा परिषदे बरोबरच शहर-जिल्हयातून कर्तव्यदक्ष असलेल्या IAS CEO यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा होत असून संबंधीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सत्य बाहेर सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. यातील हनिफनाथ देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सांगण्याला दुजोरा देत असून तो देखील जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील तालुका स्तरावर आस्थापना असताना मला देखील दवाखाण्याच्या कामासाठी शहरात राबावे लागत असल्याचे सांगत आहे. तसेच सदरची गोष्ट इतरांना सांगताना यातील जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणत आहेत की, शासनाने CEO यांना नियमानुसार शिपायांपासून ते पोलिसांपर्यंत सर्व यंत्रणा स्वतःहून दिली असताना, वैद्यकीय बिले मिळत असताना CEO यांनी असे प्रकार करणे बरोबर आहे का ? वरिष्ठांच्या अशा वागण्यामुळे आम्हाला आमच्याकडील थोडीफार यंत्रणा वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी म्हणून द्यावी लागत असते. परंतु यामुळे आरोग्य विभागातील कामे रखडत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वांना सांगत सुटले आहेत. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी IAS CEO बद्दल सर्वश्रृत केलेली माहिती काहीजण गंभीर असल्याचे सांगत यावर उलटसुलट चर्चा करत आहेत. तर काहीजण या IAS CEO यांच्यामुळे जिल्हा परिषदेला शिस्त लागली आहे. कामकाज व्यवस्थित होत आहे. सर्व विभागाच्या बैठका, आढावा घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत. कामाला गती आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लागली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एखाद्या अशा घटनेचा बाऊ करणे चुकीचे असल्याचे काहीजण म्हणत आहेत.