महापालिकेतील वर्ग 1 ते 4 मधील 226 पदांचा समावेश
सोलापूर : प्रतिनिधी
Recruitment in Solapur Municipal Corporation : सोलापूर महापालिकेत ऐन दिवाळीत पद भरतीचा धमाका असून अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील एकूण 226 पदांचा यामध्ये समावेश आहे. यासाठीची जाहिरात प्रसिध्द केली असून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी 226 पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “अ” ते गट “ड” (अराजपत्रित) मधील विविध 26 संवर्गाकरिता जागा भरण्यात येणार आहेत. विविध पदांसाठी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
हे ही वाचा Lek Ladki Yojana | मुलींना १८ वर्ष पूर्ण होताच मिळणार ७५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती…
या जाहिरातीच्या अनुषंगाने विविध पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या, त्यांची वेतनश्रेणी आदींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे स्पष्ट केली.
दरम्यान, महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून बिंदू नामावली मंजुरीसह या रिक्त पद भरती संदर्भात आवश्यक ती तयारी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया शासन आदेशानुसार टीसीएस या कंपनीच्या मार्फत राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले
या पदांची होणार भरती, कंसात पद संख्या :
मुख्य अग्निशामक अधिकारी/अधिक्षक अग्निशामक दल (1), पर्यावरण संवर्धन अधिकारी (1), पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी (1), क्रीडाधिकारी (1), उद्यान अधिक्षक (1), जीवशास्त्रज्ञ (1), महिला व बालविकास अधिकारी (1), कनिष्ठ अभियंता-आकिटेक्चर (1), समाज विकास अधिकारी (1), कनिष्ठ अभियंता-आटोमोबाईल (1), कनिष्ठ अभियंता-विदयुत (5), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी (1), सहाय्यक उद्यान अधिक्षक (1), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन-2), आरोग्य निरीक्षक (10), स्टेनो टायपिस्ट (2), मिडवाईफ (50), नेटवर्क इंजिनियर (1), अनुरेखक-ट्रेसर (2), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1), फायर मोटार मेकॅनिक (1), कनिष्ठ श्रेणी लिपीक (70), पाईप फिटर व फिल्टर फिटर (10), पंप ऑपरेटर (20), सुरक्षारक्षक (5), फायरमन (35) अशी एकूण 226 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हे ही वाचा 18 Crore Jobs | मोदींना 9 वर्षात 18 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचा पडला विसर – राहुल बोंद्रे
Lemon Tea प्या आणि निरोगी रहा; पहा Lemon Tea चे 5 आरोग्यदायी फायदे