M. K. Foundation Diwali : घरोघरी दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना समाजातील अनेक घटक असेही आहेत, की त्यांना दिवाळी माहीत नसते. रोज मोलमजुरी करणकाऱ्यांना दिवाळी दूरच. परंतु गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा गोडवा पाहायला मिळावा, म्हणून एम. के. फाऊंडेशनचे महादेव कोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत जवळपास एक हजार कुटूंबाची दिवाळी गोड केली आहे.
एम. के. फाऊंडेशनने आपल्या कृतीतून गरजू कुटूंबांपर्यंत पोहोचून, त्यांना दिवाळीचे संपूर्ण किट (M. K. Foundation Diwali) देत अनोखी भेट दिली आहे. सदरची भेट एम. आय. ङी. सी. पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. एम. के. फाऊंडेशनकडून अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटीमुळे गरजू कुटूंबांचा दिवाळीतील आनंद द्विगुणीत झाला आहे. दिवाळीची ही भेट अनेक कुटुंबियातील सदस्यांसाठी सुखावह अशी आहे. समाजातील सुमारे एक हजार कुटूबांना दिवाळीचे किट वाटप एम. के. फाऊंडेशनचे महादेव कोगनुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याचा शुभारंभ नीलम नगर भागातील कामगार वसाहतीतून करण्यात आला.
यावेळी महादेव कोगनुरे म्हणाले, दिवाळीनिमित्त घरोघरी हमखास फराळाची मेजवानी असते. अशा वेळी आपल्या समाजातील एक असाही वर्ग आहे, जो या आनंदापासून दूर आहे. हे सत्य किती भीषण अस्वस्थ करणारे असे आहे. याची जाणीव मला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एम. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करत आहोत, आणि यापेक्षा मला मोठी दिवाळी नाही.
हे ही वाचा M. K. Foundation | दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
याप्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षका अश्विनी भोसले, मल्लिनाथ धुळखेडे, शरनु मुलगे, मनोहर माचर्ला, यामुनाथ मिस्किन, गणेश संभारंब, लक्ष्मण संभारंब, सागर दासरी, नितीन सकनियाल, इरान्ना माचर्ला, श्रीनिवास बलभद्र, देविदास यलदी, चिंतलय्या तातिकोंडा, राजू मागणुर, नागनाथ मादगुंडी, सागर पाटील, केशव गांती, प्रभाकर मादगुंडी, व्यंकटेश अरगे तसेच एम. के. फाउंडेशनचे संचालक सदस्य यांच्यासह या भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
हे ही वाचा Ishalwadi | ईशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून २५ लाखांची मदत
Balaji Amines | बालाजी अमाईन्सला फिक्कीकडून ‘कंपनी ऑफ द इयर’ पुरस्कार