-
एम. के. फाऊंडेशनची मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
M. K. Foundation : दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे आज एम. के. फाउंडेशनच्यावतीने महादेव कोगनुरे यांनी केली.
संपूर्ण दक्षिण तालुक्यातील खरीप हंगामातील पीके पावसाअभावी हातची गेली आहेत. सरासरी पेक्षा पाऊस खूप कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे देखील उत्पादन होणार नाही. अशा बिकट परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या जाहीर केलेल्या यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नाही. हा तालुक्यातील शेतकरी व जनतेवर मोठा अन्याय आह. तरी तात्काळ दक्षिण सोलापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी एम. के. फाऊंडेशनच्यावतीने महादेव कोगनुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधीकारी कुमार आशिर्वाद यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महत्त्वाची व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
हे ही वाचा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्यांची तपासणी करावी
याप्रसंगी माजी संचालक महादेव पाटील, सादेपूर सरपंच मलकारी व्हनमाने, प्रकाश वाघमारे, रविकांत चांदोडे, सुनील पारे, गुरुसिद्धप्पा बिराजदार, सागर नरोनी, मालप्पा घोडके, अमित मुळवाड, शरणु मुलगे, संजय केंगनार, पवन कोमूल, सोम करपे यांच्यासह एम के फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
हे ही वाचा दिवाळीपूर्वी सिंदखेड राजा तालुका दुष्काळी घोषित करा : सविता मुंढे यांची मागणी
मोदींना 9 वर्षात 18 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचा पडला विसर – राहुल बोंद्रे