-
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे शासकीय विभागांना आदेश
सोलापूर : प्रतिनिधी
Kunbi Caste Certificate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे कुणबी नोंद तपासणी कामाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित केले जात आहेत. त्या पद्धतीने अन्य जिल्ह्यातही कार्यवाही करावी, असे त्यांनी सुचित केले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी 12 प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आलेली असून या समितीने पुराव्याची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
हे ही वाचा हम भी जरांगे, तुम भी जरांगे, हम सब जरांगे
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय कक्षाची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत केल्या असून संबंधित तहसीलदार हे त्या समितीचे सहअध्यक्ष असतील. या समितीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपनिबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका आदींचा सदस्य म्हणून समावेश केला आहे.
तालुकास्तरीय समितीमध्ये इतर विभागाचे अधिकारी आवश्यक असल्यास समितीच्या अध्यक्षांनी त्यांचा समितीत समावेश करावा. या समितीने तहसील कार्यालयामध्ये मराठा कुणबी (Kunbi Caste Certificate) पुरावे गोळा करण्यासाठी व दाखला देण्यासाठी तालुका स्तरावर मदत कक्षाची स्थापन करावी. तसेच समितीने गाव पातळीवरील अभिलेखाचा शोध घेण्यासाठी गावस्तरीय समिती नेमावी. समितीने आपल्या कार्यालयात कुणबी मराठा पुराव्यांचा शोध घेऊन त्याबाबतचे पुरावे व अहवाल समिती अध्यक्ष व सहअध्यक्क्षांकडे सादर करावेत. अध्यक्ष व सहअध्यक्षांनी कुणबी दाखले वितरण करण्याबाबत सुधारित शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा Maratha Reservation | आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक
शासकीय विभागांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्याबाबत 1948 पूर्वीचे तसेच 1948 ते 1967 पर्यंतचे विविध शासकीय अभिलेखांची तपासणी करावी. त्यामध्ये कुणबी नोंदी असलेली कागदपत्रे शोधावीत. जि. प. ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कारागृह अधीक्षक, पोलीस विभाग, रेल्वे विभाग, सह जिल्हा उपनिबंधक, भूमी अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, महापालिका व नगरपालिका विभागांनी उपरोक्त कालावधीतील सर्व अभिलेखांची तपासणी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय समिती कक्षाचे प्रमुख दादासाहेब कांबळे यांनी दिल्या आहेत. Maratha Reservation
हे ही वाचा Maratha Reservation GR | मोदींचा एक फोन येऊ द्या; हे तिघे लगेच जीआर घेऊन येतील