बुलडाणा : प्रतिनिधी
Protest march of Congress Against BJP : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार नाकर्ते आहे. या सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आले.
राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतक-यांना मिळावी, सोयाबीन, कापुस या पिकांसह सर्व पिकांचे हमी भाव खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावे, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पिकविमा लागु करावा, अमंली पदार्थांची तस्करी करणा-यांवर कठोर कारवाई करावी, घरगुती वापरातील गॅस, डिझेल, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, नैराशात अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी तातडीने मोठया प्रमाणात नोकर भरती करावी, राज्यातील जनतेची जातनिहाय जनगनना करून सर्वप्रकारच्या मागासवर्गीयांना आरक्षण लागु करावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेसच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हे ही वाचा Lek Ladki Yojana | मुलींना १८ वर्ष पूर्ण होताच मिळणार ७५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती…
यावेळी काँग्रेसच्यावतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शाम उमाळकर, आमदार धीरज लींगाडे, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके, विजय अंभोरे, स्वातीताई वाकेकर, संजय राठोड, राम डहाके, ॲड विजय सावळे, मनोज कायंदे, गजानन मामलकर, सतेंद्र भुसारी, सुनील सपकाळ, मनोज लाहूडकर सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.