शेतकऱ्यांसह अमडापूर पोलिसात तक्रार दाखल..
चिखली : प्रतिनिधी
MSEB : शेतकऱ्यांचा रब्बीच्या पेरण्या सुरू असून नुकतीच पिके उगवणीला सुरुवात झाली आहे. तेवढया कमी पाण्यात सिंचन करून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र दुसरीकडे विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, हक्काचे कनेक्शन असूनही पिके सुकायला लागल्याने चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे विज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयात ९ नोव्हेंबर रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या देत वीज वितरण कंपनीच्या विरोधात अमडापूर पोलिसांकडे लेखी तक्रार देत कंपनीवर कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करून सिंचनाअभावी नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने नुकसानभरपाई दयावी, अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांच्यावतीने पोलिसात देण्यात आली.
हे ही वाचा आरोग्य विभागात मुंबई, पुणयासह 11 ठिकाणी उपसंचालकांच्या नव्याने नियुक्त्या
अत्यल्प पर्जन्यमान व दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांना उधार उसनवारी करून बी-बियाणे आणत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या. विहीर, बोअरवेल तसेच तलावातील उपलब्ध कमी पाणी साठ्यावर शेतकऱ्यांचे कसे बसे सिंचन सुरू असताना विज वितरण कंपनीने तुघलकी व नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हक्काचे कनेक्शन मीटर पावती असताना वीज मिळत नाही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. उलट विज पुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी शेतकरी उपकेंद्रावर गेले तर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या शेतकऱ्यांना देण्याच्या घटना जिल्हाभरात समोर येतायत. वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रीतसर कनेक्शन व मीटर पावती असतांना हक्काची वीज का मिळत नाही? विजेअभावी शेतकऱ्यांची पिके सुकत आहेत, हे शेतकऱ्यांचे नुकसान असून शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी विरोधात कलम ४२० अंतर्गत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दयावी, अशी लेखी तक्रारी द्वारे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी हितासाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राम डहाके यांनी दिला आहे.
हे ही वाचा महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक: गैरहजर अभियंत्यांच्या खुर्चीला चिटकविले निवेदन
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, किसान सेल तालुकाध्यक्ष समाधान गीते, माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, सोशल मीडिया समन्वयक ज्ञानेश्वर पचांगे, सरपंच गणेश जवंजाळ, राष्ट्रवादी युवा नेते निखिल अंभोरे, सुरेश गुंजकर, समाधान देशमुख, प्रदीप जाधव, अक्रम खासाब, गजानन गीते, गणेश गीते, प्रकाश कंकाळ, गोपाल शिंदे, वैभव गुंजकर, संजय लहाने, धनंजय गुंजकर, शांताराम लहाने, तुषार तांबट, ज्ञानेश्वर खपके यांचे सह मंगरूळ नवघरे, नायगाव खुर्द, नायगाव बु.सावंगी गवळी, वरखेड, घनमोड मानमोड सह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
हे ही वाचा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्यांची तपासणी करावी
मोदींना 9 वर्षात 18 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचा पडला विसर – राहुल बोंद्रे