सोलापूर : प्रतिनिधी
Police Suicide by Shooting Himself : येथील शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केशव नगर पोलीस वसाहतीत त्या पोलिसाने रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय 35) असे त्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. भाऊबीजेच्या दिवशी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी संबंधीत पोलिसाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.
सुरक्षेसाठी शिरसट यांच्याकडे नेहमी SLR रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर राहुल हे रायफल जमा करत होते. परंतु आज बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर राहुल यांनी रायफल जमा केली नाही, सदरची रायफल ते घरी घेऊन गेले. आणि केशव नगर पोलिस वसाहतीत त्यांनी त्यांच्या राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
हे ही वाचा Police Shot Himself | पोलीस अधिका-याने स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
भाऊबीज असल्याने केशव नगर पोलिस वसाहतीत मोठ्या आनंदाचे वातावरण होते. परंतु रायफलच्या आवाजाने केशव नगर पोलीस वसाहत हादरली आहे. राहुल यांनी अज्ञात कारणावरून पोलिस वसाहतीत रायफलची गोळी स्वतःवर झाडून आत्महत्या (Police Suicide by Shooting Himself) केली आहे. सदरचा आवाज आल्यानंतर आजूबाजूला राहत असलेल्या पोलिसांनी राहुल यांच्या रूमकडे धाव घेतली. त्यावेळी राहुल शिरसट हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांना दिसले.
राहुल शिरसट हे मुंबई पोलिस दलात 2011 साली भरती झाले होते. 2017 साली त्यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली झाली होती. शिरसट हे सोलापूर शहर पोलिस दलात बदली होऊन आल्यानंतर त्यांची नियुक्ती सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली होती. पुढे प्रशासकीय कारणास्तव शिरसट यांची बदली मुख्यालयात झाली.
संपूर्ण कुटूंब पोलिस दलात…
पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून शिरसट हे सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. शिरसट यांचे वडील सोलापूर पोलिस दलात गेली अनेक वर्षे सेवा करून सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. राहुल यांचा भाऊ देखील सोलापूर शहर पोलिस दलात सध्या कार्यरत आहे. तर राहुल शिरसट यांची पत्नी सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. राहुल शिरसट यांची बहीण ही महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी आहे. संपूर्ण कुटुंब पोलिस दलात कार्यरत असलेल्या राहुल शिरसट यांनी भाऊबीजेला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली आहे ? याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे.
दोन महिन्यात दुसरी घटना
सोलापूरातीलच परंतु नांदेड पोलीस दलात कार्यरत साहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद मळाले यांनी सोलापूर शहरातील कुमठा येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची घटना ताजी आहे. त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी चिट्टी लिहून संबंधीत अधिकाऱ्यांची त्यामध्ये नावे लिहली होती. त्यानंतर सोलापूरात ही दुसरी घटना घडली आहे. या दोन महिन्यांत दोन पोलिसांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हर आणि रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. Police Suicide by Shooting Himself
हे ही वाचा ACB TRAP | मुतारीत स्विकारल्या खेळण्यातील नोटा; हवालदारसह झिरो पोलिस अँटीकरप्शनच्या जाळ्यात
एक कोटीची लाच, MIDC तील सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
(दैनंदिन महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी “सत्ताकारण”च्या अधिकृत WhatsApp Channel ला फॉलो करा.)