सोलापूर : प्रतिनीधी
प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर, सोलापूर येथे 30 हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. परिणामी येथील कामकाजाचा, पायाभूत सोयी-सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज घेतला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रे नगर गृहप्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एसटीपी आणि डब्ल्युटीपी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत ठेकेदाराकडून ज्या पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येत आहेत, त्या सर्व सोयी-सुविधांचे कामकाज त्वरित करण्याचे आदेश दिले.






