सोलापूर : प्रतिनिधी
Unauthorized Parking Space : बेगम पेठ परिसरातील बहुतांश सर्वच इमारतींमधील पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू आहेत. याला जसे त्या-त्या इमारतींचे मालक-बिल्डर जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार महापालिकेतील अधिकारी-कर्मचारीही आहेत. पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू असताना वापर परवाने कसे काय देण्यात आले ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात असून पार्किंगमधील जागेतील उद्योग-व्यवसायास अभय देणाऱ्या मनपाच्या अधिकाऱी-कर्मचाऱ्यांवरही आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे तक्रारदार मुस्ताक महिबूब शेख यांनी मागणी केली आहे.
हे ही वाचा पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उभारलेल्या उद्योग-व्यवसायांचा अहवाल आयुक्तांच्या टेबलवर
बेगम पेठेतील इनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये अनधिकतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू असल्याची लेखी तक्रार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांच्याकडे दिली आहे. त्या तक्रारीमध्ये बेगम पेठ (Begum Peth) येथे बांधकाम परवाना नुसार बांधकाम केलेले नाही, परवानगी घेताना महापालिकेच्या नियमानुसार तळमजला पार्किंगसाठी सोडण्यात आला, परंतु सध्या प्रत्यक्षात तेथे अनेक शॉप (गाळे) बांधून भाड्याने देण्यात आले आहेत. याला रफिक मस्तुमसाब खरादी, रियाज महम्मद पटेल, अफसर शेख, कुरेशी, पिरजादे आदी जबाबदार आहेत. या सर्वांनी व इतरांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. शासनाच्या टॅक्सची चोरी केली आहे. काही ठिकाणी दोन मजल्यांचा परवाना घेऊन प्रत्यक्षात 5 मजली बांधकाम केले आहे. अतिरिक्त FSI वापरून बांधकाम करण्यात आले आहे, महापालिकेच्या नियमानुसार सेट बॅक मार्जिन सोडलेली नाही, संबंधीत अनेक इमारतींचा वापर परवाना न घेता इमारत वापरात आणली आहे. अशा पध्दतीने गैरप्रकार करत पार्किंगच्या जागी शॉप/गाळे (Unauthorized Parking Space) सुरू असल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांना, तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना नाहक ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील रहिवासी जनतेलाही दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील बेकायदेशीर पार्किंगमधील शॉपवर कायदेशीर कारवाई करून पाडकाम करावे, शॉप/गाळे धारकांकडून 2001 पासून कमर्शिअल टॅक्स आणि दंड वसुल करावा, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी सांगितले.
हे ही वाचा बेगम पेठेत पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू
मनपाचे अधिकारी-कर्मचारीही जबाबदार…
बेगम पेठेतील इमारतींमधील पार्किंगच्या जागेतील अनधिकृत उभारलेल्या उद्योग-व्यवसायांचा अहवाल बांधकाम विभाग प्रमुख सारिका अकुलवार यांनी आयुक्तांकडे सादर केला आहे. या अहवालावरून ज्यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. त्यांच्यावर आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले या निश्चितच कारवाई करणार आहेत. परंतु त्याच बरोबर या अनधिकृत उद्योग-व्यवसायास अभय देणारे महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिक आणि तक्रारदार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांच्याकडून केली जात आहे.
हे ही वाचा ‘माझा नवरा जगातील सर्वात…’, Riteish Deshmukh याच्यासाठी Genelia डिसूझाची खास पोस्ट
प्रत्येक वर्षी कापला जातो तुमचा खिसा; बँकेचे हे चार्जेस माहिती आहेत का?