सोलापूर : प्रतिनिधी
जगभरात हिमोफिलिया या आजाराने त्रस्त लोकांची संख्या जवळपास 50 हजार आहे. या अजारावरील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तरी जिल्हा रूग्णालयातील “हिमोफिलिया डे केअर सेंटर”चा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले.
हे ही वाचा आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड
जागतिक हिमोफिलीया दिनानिमीत्त जिल्हा रुग्णालयात बुधवारी, 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जनजागृतीपर हिमोफिलीया डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने बोलत होते. याप्रसंगी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, रेडीओलॉजिस्ट डॉ. राजेश फडकुले तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाते.
हे ही वाचा चुकीच्या आदेशान्वये डॉ. एस. पी. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात ठाण मांडून
पुढे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने म्हणाले, हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफिलिया’च्या रूग्णांमध्ये 8 क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफिलिया ए’ नावाचा आजार होतो. 9 क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि 11 क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफिलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो 0.01% लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत, ज्यावर उपचार सापडलेला नाही. त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो.
हे ही वाचा “नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली
दरवर्षी 17 एप्रिल हा दिवस “जागतिक हिमोफिलिया डे” म्हणून साजरा केला जातो. जागतीक हिमोफिलिया दिवस 2024 ची थीम “सर्वांसाठी समान प्रवेश सर्व रक्तश्राव विकार ओळखणे” या थिमची मुख्य कल्पना म्हणजे प्रत्येकाला उपचार मिळतील याची खात्री करणे, त्यांना कोणत्या प्रकारची रक्तश्राव समस्या आहे, त्यांचे वय किती आहे, ते कोठे राहतात, किंवा त्यांचे लिंग काहीही असले तरीही त्यांना उपचार देणे.
148 रूग्णांवर नियमित उपचार सुरू
जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे सुसज्ज असे हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे सध्यस्थितीत 148 रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
हे ही वाचा चौकशी संपली, कारवाईचा अहवाल गुलदस्त्यात