सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समोरच भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी नविन आरोग्य केंद्रांच्या मंजुरी, जिल्हा नियोजन समितीच्या परस्पर कामे निश्चीत करणे, टक्केवारी घेऊन विविध कामांचे वाटप करणे असे आदी विविध कामकाजावरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यावर टक्केवारीचे आरोप केले. यावर पालकमंत्री गोरे यांनी देखील संतोष नवलेंच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत म्हणत चौकशी करून कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना या बैठकीत दिले.
हे ही वाचा टक्केवारीनंतर आरोग्यातील अधिकाऱ्यांनी दिली सप्लायरला ऑर्डर
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 30 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवनमध्ये झाली. यावेळी आमदार आवताडे यांच्याकडून डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचे गंभीर आरोप केले गेले. यावेळी आमदार आवताडे म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंनी कोणाच्या शिफारशीने निधी विविध ठिकाणी वळवला आहे. त्यांनी या वर्षात दुरुस्तीसाठी एक रुपयांचा निधी DPC मधून दिला नाही, कोणत्याही लोकप्रतिनिधीची मागणी नसताना काही ठिकाणी निधी खर्च केला गेला आहे. 11 कोटी रूपयांची तरतूद आहे, साडे दहा कोटींची पाच कामे मंजूर केली आहेत, या कामांमध्ये गोलमाल आहे. आमदारांच्या कार्यालयातून फोन गेल्यानंतर तुमचा या निधीशी काहीही संबंध नाही, अशी उत्तरे दिली जातात. नियुक्त्यांमध्येही गैरव्यवहार झाले आहेत, असे गंभीर टक्केवारीचे आरोप आमदार समाधान आवताडे यांनी केले.
हे ही वाचा “नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली
यावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा प्रश्न गांर्भीयाने घेत आक्रमकता दाखवली. त्या कामांना “डीपीडीसी”ची शिफारस आहे का? तुमच्या मर्जीने कामे केली आहेत का? लोकप्रतिनिधींच्या तक्रारी गंभीर आहेत. तातडीने याची चौकशी करा, जिल्हा नियोजन समितीच्या शिफारशी शिवाय एकही मंजुरी दिली असेल, तर संतोष नवलेंवर कारवाई प्रस्तावित करा, असे आदेश यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. दरम्यान यावेळी डॉ. संतोष नवले हे मोबाईलवर बोलत असताना दिसून आले. तेव्हा गोरे यांनी त्यांना उठवून पुन्हा सभागृहात मोबाईलवर बोलायचे नाही, अशी सक्त ताकीद दिली.
वाचा उद्या सत्ताकारणमध्ये “पूर्वीपासून वादग्रस्त असलेले डॉ. संतोष नवले, त्यांची टक्केवारी वसुली करणारी टोळी आणि बरंच काही…”
हे ही वाचा Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
Percentage | टक्केवारीतील पाचशे रूपये कमी दिल्याने अधिकारी नाराज
Bill | IDW मधील ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊनही बिलांसाठी अडवणूक