आरोग्य विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
बदल्या, प्रतिनियुक्त्या, अतिरीक्त पदभार, NHM मधील भरतीमध्ये घोटाळा, लक्ष्मी दर्शनाशिवाय पुनर्नियुक्त्या न देणे, औषध खरेदीत बोगस बिले (Bill) सादर करणे, मंजुरी नसताना पेस्ट कंट्रोलची बिले काढणे, IEC मध्ये खोटी व वाढीव छपाई दाखवूण प्रचार व प्रसिध्दीच्या नावाखाली मलिदा लाटणे आदी विविध कारणांमुळे आरोग्य विभाग नेहमीच चर्चेत आहे. त्याही पुढे जाऊन सध्या IDW मधील ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊनही त्यांची बिलांसाठी अडवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा Singham Movie | “सिंघम”सारखे चित्रपट समाजासाठी घातक – न्यायमूर्ती गौतम पटेल यांचे वक्तव्य
एनएचएम (NHM) मधील पायाभूत सुविधा विकास कक्षा (Infrastructure Development Wing) मार्फत जि. प. आरोग्य विभाग सोलापूरकडील प्राथमिक आरोग्य केंद्रे (PSC) व उपकेंद्रांचे बांधकाम, नुतनीकरण, फर्निचर, लाईटची कामे केली जातात. यामधील ठेकेदारांकडून सदरची कामे करून घेतली आहेत. मात्र त्यांनी बिले सादर केल्यानंतर त्यांच्याकडून सदरच्या बिलासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, एनएचएम मधील कंत्राटी महिला अधिकारी आणि कंत्राटी अधिकारी यांनी टक्केवारी (percentage) वसुल केली. मात्र टक्केवारी घेऊनही संबंधीतांच्या बिलावर सह्या केल्या जात नाहीत. यातील बरेच ठेकेदार बाहेरच्या जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने ठेकेदार त्रासले आहेत. त्यांनी थेट वरिष्ठांकडे व माध्यमांच्या प्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. तसेच सीईओंच्या (CEO) नावेही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून टक्केवारी वसुल केली आहे. परंतु याबाबत सीईओ यांना याबाबत साधी कल्पना नसुन त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचे ठेकेदाराने सांगितले. Bill
वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश
संबंधीत ठेकेदाराने सांगितले की, संबंधीत कामांसाठी मुंबई आणि पुणे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग आहे. कोणत्या ठेकेदाराला कोणते काम द्यावयाचे, एखाद्या ठेकेदाराला थेट कामे मिळवून द्यावयाची अशी कामे वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे IDW मधील कामांमध्ये सहभागी वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी, येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कंत्राटी अधिकारी-कर्मचारी, इंजिनिअर यांची चौकशी करण्याची मागणी खुद्द ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. तसेच गेल्या 6-7 वर्षांत त्याच त्या मर्जीतील ठेकेदाराकडूनही कामे करून घेतली जात आहेत. त्यांच्या कामाची गुणवत्ता नाही, कमी प्रतिच्या कामाची वाढीव बिले सादर केली जात आहेत, चांगल्या गुणवत्तेचे काम करणाऱ्या ठेकेदारांना डावलले जात आहे. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी “बिराजदार” या ठेकेदाराला पोसले असून बहुतांश कामे त्यांच्याकडून करून घेतली आहेत. निकृष्ठ काम, वाढीव व बोगस बिले असा प्रकार झाला असून या सर्व कामांची, सर्व ठेकेदारांची, संबंधीत कामाच्या वर्कऑर्डरपासून ते बिले काढण्यापर्यंत सर्व कागदपत्रांची व बिलांची तपासणी वरिष्ठ कार्यालयाकडून करण्याची मागणी खुद्द ठेकेदारांकडूनच होत आहे. Bill
हे ही वाचा Dunki Release Date | जवान सुपरहिट होताच शाहरुखने केली “Dunki” ची घोषणा