सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी आहेत. मात्र ते घोटाळे करणाऱ्यांकडे पदे का सोपवतात ? असा प्रश्न उपस्थित करत औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकी यांची औषध भांडार प्रमुख पदावरून हकालपट्टी करा, शासनाचे होणारे नुकसान थांबवा, अशी तक्रारी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी केली आहे.
हे ही वाचा अर्हता नसताना महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातारकरांकडून प्रयत्न
भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सध्या जि. प. आरोग्य विभागातील औषध भांडार येथे औषध भांडार प्रमुख पदावर प्रविण सोळंकी हे गैरप्रकारे कार्यरत आहेत. जेष्ठता नसताना प्रविण सोळंकी हे येथे गेल्या 10 वर्षांपासून वारंवार कार्यरत राहीले आहेत. यादरम्यान त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहीली आहे. अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. जि. प. सदस्यांनी त्यांच्या गैरप्रकाराबाबत वारंवार आवाज उठवला आहे. त्यामुळे प्रविण सोळंकी यांना औषध भांडार येथून हटवावे आणि त्यांना त्यांच्या मुळे ठिकाणी पाठवावे.
हे ही वाचा तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे देऊनही निवड यादी जाहीर
प्रविण सोळंकी यांनी यापूर्वी औषध भांडार येथे कार्यरत असताना औषधे जाळली आहेत. 2018 साली आषाढी वारीत औषध खरेदीमध्ये नियमबाह्य पध्दतीने औषधे खरेदी करून घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे 1 कोटींची वसुली लागली आहे. सोळंकी हे मर्जीतील औषध कंपन्या व नातलगांच्या औषध कंपन्यांना नियमबाह्य पध्दतीने ऑर्डर देतात. औषधांची ऑर्डर दिलेल्या अनेक कंपन्यांकडून एक्सपायरी डेट जवळ आलेली औषधे खरेदी करतात. आणि बिले मात्र टेंडर दिलेल्या वर्कऑर्डर प्रमाणे काढतात. उर्वरित मार्जीन/टक्केवारी ते घेतात. नविन व इतर कंपन्यांना ते टेंडर न भरण्यास ते सांगतात. औषधांच्या खोट्या नोंदी स्टॉकबुकला घेतात. तसेच एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बंधू सोबत औषध कंपनीमध्ये भागीदारही आहेत. कोटेशनवर बोगस खरेदी करतात. त्यामुळे अशा अनेक गैरमार्गाने कार्यरत असलेल्या व शासनाची लुबाडणुक करणाऱ्या प्रविण सोळंकी यांना हटवून त्यांना त्यांच्या मुळ ठिकाणी पाठवावे. तसेच त्यांना लवकरात लवकर न हटवल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी दिला आहे.
सोळंकीच्या काळातील सर्व खरेदीची चौकशी करावी
-मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे रूजू झाल्यापासून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. प्रशासनावर वचक आहे. मात्र आरोग्य विभाग याला अपवाद असून आरोग्य विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांची दिशाभूल करून गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांची दिशाभूल करून दुसरीकडे स्वतःच्या मनप्रमाणे कामकाज केले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन भ्रष्टाचारी लोकांची वर्णी आरोग्य विभागात लावली गेली आहे. सोळंकी यांची नेमणूक म्हणूजे त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे वरील सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सोळंकीच्या काळातील सर्व खरेदीची सखोल चौकशी करून सोळंकीला बडतर्फ करावे.
-रत्नमाला परदेशी, शहर कार्याध्यक्षा, भीम शक्ती सामाजिक संघटना.
हे ही वाचा पैशांची तत्काळ गरज आहे ? तत्काळ मिळवा Property Loan
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings