सोलापूर : प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, सोलापूर ने तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे दिले आहेत. तरी देखील निवड यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सदरच्या नियुक्त्या थांबवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सदरच्या समितीने दिला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय बिदरकोटे, कार्याध्यक्ष आदित्य पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच शासनाने त्वरित पेपर फुटी संदर्भात विशेष कायदा करावा, पार पडलेली तलाठी भरती प्रक्रीया रद्द करून पुन्हा तलाठी भरती प्रक्रिया ४५ दिवसांच्या आत लोकसेवा आयोगामार्फत घ्यावी अशी मागणी करण्यात आली. तलाठी पेपर फुटी संदर्भात अनेक पुरावे आम्ही संबंधित विभागाला दिले आहेत. उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचा निकाल येणे अपेक्षित असताना तलाठी भरती लवकरात लवकर आटपून त्यांना नियुक्त्या देण्याचा घाट शासन घालत आहे.
हे ही वाचा सर्फराजच्या टीम इंडियातील एन्ट्रीवर पाकिस्तानी खेळाडूकडून शुभेच्छा
महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्याही जागा कमी-जास्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या जागा असतानाही त्या भरल्या गेल्या नाहीत. अनाथ मुलांसाठीच्या जागा जाहिरातीत असतानाही निवड यादीमध्ये अनाथ मुलांची संख्या कमी दिसत आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया कुठेतरी चुकत आहे, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्यभरासाठीचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पेपर फुटी संदर्भात व घोटाळाबाजांना आवर घालण्यासाठी लवकरात लवकर कडक कायदा पारित करावा. गरीब-गरजू विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा फी कमी करावी. केंद्र सरकारच्या धर्तीवर मुलींना फी आकारू नये. तलाठी भरती, सरळ सेवा व इतर परीक्षा एमपीएससीच्या मार्फत व्हाव्यात, यासह इतर विविध मागण्यासंदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
हे ही वाचा आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्यावतीने अमेरिकेत प्रजासत्ताक दिन साजरा
तलाठी भरती रोखा, अन्यथा आंदोलन करू
राज्यात तलाठी पेपर फुटी संदर्भात अनेक पुरावे आम्ही संबंधित विभागास दिले आहेत. त्या जिल्ह्यातील संबंधित पोलीस विभागालाही पुरावे सादर केले आहेत. दुसरीकडे हायकोर्टातही याचिका दाखल करून त्यासंदर्भात निर्णय बाकी आहे. त्यामुळे विषेश समितीमार्फत चौकशी झाल्याशिवाय तलाठी नियुक्ती प्रमाणपत्र देऊ नये. यामुळे प्रामाणिक, होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करूनच निवड करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू.
– प्रशांत शिरगुर, उपाध्यक्ष तथा प्रवक्ता, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीर, महाराष्ट्र राज्य.
हे ही वाचा Property Loan | पैशांची तत्काळ गरज आहे ? तत्काळ मिळवा Property Loan
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings