सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निमंत्रक सदस्य असलेल्या मनिष काळजे यांनी पहिलीच बैठक गाजवली. त्यांनी रमाई आवास योजना, महापुरूषांच्या जयंती मिरवणूकीत वेळेत देण्यात येणार दुजाभाव, ई-महासेवा केंद्रे आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी निमंत्रक म्हणून नव्या 10 सदस्यांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचाही सहभाग होता. या 10 सदस्यांची जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होती. यामध्ये मनिष काळजे यांनी सर्वच विषय आकडेवारीसहीत आणि अभ्यासपूर्ण असे मांडले. संबंधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपस्थित सर्व सदस्य आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
हे ही वाचा New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
यावेळी मनिष काळजे यांनी सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेली मंजुरी ही 4 हजार 465 इतकी आहे. मात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही. अनेक वर्षांपासून प्रकरणे प्रलंबित आहेत. अधिकारी कागदपत्रांसाठी अडवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तसेच सर्व महापुरूषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना देण्यात येणारा वेळ हा समान म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंतचा असावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
हे ही वाचा धक्कादायक! अमेरिकेत जाण्यासाठी २ लाख भारतीयांनी स्वीकारला ‘Dunki रूट’
जिल्हयातील ई-महासेवा केंद्र जे ५ वर्ष जुने आहेत. त्यांच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. ते पुर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा गेल्या अनेक वर्षांपासून दिल्या गेल्या नाहीत. यावर काय कार्यवाही करणार ? असाही प्रश्न यावेळी काळजे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
Parking Space | पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना वर्धास्थ कोणाचा ?