सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी अनेकांमध्ये रस्सीखेच असते. परंतु यामध्ये जिल्हाध्यक्ष मनिष काळजे, महेश साठे, चरणराज चवरे आणि महेश चिवटे यांनी बाजी मारली आहे. यांच्या नावांची शिफारस खुद्द शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून पालकमंत्र्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे काळजे, साठे, चवरे, चिवटेंची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शिवसेना (शिंदे गट) सचिव संजय मोरे यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी स्मरणपत्र पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार काळजे, साठे, चवरे आणि चिवटे या पदाधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या 4 जणांना सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत म्हणून नियुक्ती करावी.
यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव कुमार आशिर्वाद यांनी येत्या 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे या बैठकीस मनिष काळजे, महेश साठे, चरणराज चवरे आणि महेश चिवटे यांना उपस्थित राहता येणार आहे.
मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आभार
