सोलापूर : प्रतिनिधी
Parking Space : सोलापूर शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय सोलापूर शहरात नव्याने येत आहेत. शिवाय आय.टी. पार्कची निर्मिती होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोलापूर शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या अनुषंगाने शहरात दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. आत्तापासूनच शहरात विशेष करून बाजारपेठ व व्यापारी परिसरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अनेक व्यवसायिकांनी पार्किंगच्या जागेत बेकायदेशीर, राजरोसपणे उद्योग व्यवसाय चालू केला आहे. प्रशासनाचे सारेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. यामुळे अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना वर्धास्थ कोणाचा? तथाकथित पुढाऱ्यांचा की भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा ? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुश्ताक महबूब शेख यांनी केलं आहे. परंतु त्यांचा आवाज पद्धतशीरपणे दाबण्याचा प्रयत्न तथाकथित पुढारी व भ्रष्टाचारी अधिकारी करीत आहेत ही बाब खूपच गंभीर आहे. शेख यांनी बेगम पेठ बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करून उद्योग थाटल्याबाबत लेखी तक्रार महानगरपालिकेकडे केली आहे. परंतु तथाकथित पुढाऱ्यांच्या चापलूसीपणामुळे अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी माध्यमांसमोर खंत व्यक्त केली आहे.
हे ही वाचा Shah Rukh Khan स्टारर ‘डंकी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
सोलापूर महानगरपालिकेकडे अनेक चांगले अधिकारी होते आणि आहेत. परंतु एखाद दुसऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे कारवाई होत नव्हती. आता मात्र कारवाई होणार हे निश्चित आहे.
बेगम पेठ ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी शहरातील हजारो ग्राहकांची रेलचेल असते. पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावतात त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी हा नित्य नियमच झाला आहे. रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही पार्किंग नसल्यामुळे दुर्घटना झालीच तर त्याला जबाबदार कोण ? तथाकथित पुढारी की भ्रष्टाचारी अधिकारी ?असा प्रश्न आता नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.
क्रमश…