सोलापूर : प्रतिनिधी
Issue Termination order of Nagesh Chaudhary : येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद लालू पटेल यांनी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. परिणामी नियमबाह्य पध्दतीने नागेश चौधरी यांची नेमणूक रद्द करावी, नागेश चौधरींची सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करा, असे लेखी आदेश चौकशी अधिकारी तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई चे सहसंचालक (अतांत्रिक) सुभाष शां. बोरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना दिले आहेत.
हे ही वाचा Service | कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केलेल्या नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा
सामाजिक कार्यकर्ते पटेल यांनी नागेश चौधरी यांच्या बेकायदेशीर नेमणूकीबद्दल तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीमध्ये कार्यक्रम सहाय्यक (DEO) नागेश चौधरी यांना सेवेतून कार्यमुक्त करुन पुन्हा सेवेत समावून घेण्यात आल्याचे नमुद केले होते. त्याअनुषंगाने सदर प्रकरणी तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे राज्यस्तरावरुन सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते जावेद लालू पटेल यांच्या तक्रारीनुसार वस्तुस्थिती आढळून आली. परिणामी चौकशी अधिकारी तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई चे सहसंचालक (अतांत्रिक) सुभाष शां. बोरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना 31 ऑक्टोबर 2023 रोजी चौकशीअंती चौधरी यांची सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा Inquiry | नागेश चौधरी हाजीर हो…
आदेशात म्हटले आहे की, कार्यक्रम सहाय्यक नागेश चौधरी यांची सेवासमाप्ती, पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून नविन नियुक्ती, 9 हजार 600 या वेतनावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे पदस्थापना, परत वेतन संरक्षित करुन 18 हजार 778 रूपये वेतनावर सुधारीत पुर्ननियुक्ती आदेश देल आहेत. नागेश चौधरी यांची सेवा समाप्तीची नस्ती गहाळ, असे अनेक गैरप्रकार घडले आहेत. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कोणत्याही संस्थास्तरावरुन एखादया कर्मचा-याच्या अकार्यक्षमता/अनियमिततेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आली असेल, तर त्या कर्मचा-याला यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोणत्याही पदाकरीता विचार केला जाणार नाही. सदर कर्मचा-यास यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करण्याची संधी देण्यात येऊ नये, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना चौधरी यांच्या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यक्रम सहाय्यक नागेश चौधरी यांच्या सेवा समाप्तीची सर्व कागदपत्रे गहाळ झालेले असून सदर गहाळ झालेल्या नस्तीची फेरचौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांचे मार्फत करुन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यात यावा. तसेच सदर कंत्राटी कर्मचा-याचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने सदर प्रकरणी कार्यक्रम सहाय्यक नागेश चौधरी यांना नियमबाहय रित्या देण्यात आलेली थेट नियुक्ती आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रद्द करुन त्यांचे सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करण्यात यावेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करण्यात यावा, असे लेखी आदेशात म्हटले आहे.
इतरही दोषींवर कारवाई करावी…
आरोग्य विभागात कायम सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचार्ऱ्यांचा मुजोरपणा वाढला आहे. त्यांच्याही तक्रारी वरिष्ठ कार्यालयात करण्यात येतील. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत करून कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनेक भ्रष्टाचार, अनियमितता केली आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी. तसेच चौधरींच्या बाबती सखोल चौकशीअंती योग्य तो निर्णय घेण्यात आला. तसाच यातील फाईली गहाळ करणे, चौधरींना पुनर्नियुक्ती देणे, त्यांचे वेतन वाढवून देणे आदी गैरप्रकारात सामील सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबन आणि बडतफींची कारवाई करावी.
– जावेद लालू पटेल, तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते
हे ही वाचा Inquiry | नागेश चौधरींच्या चौकशीला मिळेना मुहूर्त
Medical College | नेमणूक मेडिकल कॉलेजमध्ये, कामकाज जि. प. आरोग्य विभागात
Health Department | आरोग्य मंत्र्यांचा आदेश झुगारून रफिक शेख मुख्यालयातच