सोलापूर : प्रतिनिधी
तत्कालीन सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या कार्यकाळात पर्यवेक्षक पदावर पदोन्नती झाल्या आहेत. या पदोन्नतीमध्ये आरक्षण धोरण कायदा 2004 ची पायमल्ली होऊन खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या गैरप्रकाराची त्रिस्तरीय समितीकडून चौकशी करून डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अजित वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
हे ही वाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”
सदरच्या तक्रारी निवेदनामध्ये म्हटले आहे की, डॉ. राधाकिशन पवार हे बऱ्याच नियमबाह्य कामामध्ये नेहमीच चर्चेत असतात. नुकत्याच विधान सभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत विधान भवनात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच तत्कालीन सहसंचालक (हिवताप) डॉ. राधाकिशन पवार यांनी 1 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीतील आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देताना 2 जुलै 2014 च्या शासन निर्णयाची पायमल्ली केलेली आहे. सदरच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेले आहे की, सदरच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी किमान 10 वर्षे त्या ठिकाणी काम केलेले नसावे, असे असतानाही आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती, बदली देताना बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे कर्मचारी लाखामध्ये रक्कम देतील. त्यांनाच सोयीच्या ठिकाणी बदली दिलेली होती. तर जे कर्मचारी पैसे देणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक गैरसोयीच्या ठिकाणी बदली केलेली होती. यामध्ये सेवानिवृत्ती जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या ठिकाणी बदली करू नये असे धोरण आहे. मात्र आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देताना सेवानिवृत्तीस आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक लांबच्या जिल्ह्यामध्ये बदली केलेली आहे. डॉ. राधाकिशन पवार यांचा सहसंचालक हिवताप पदाचा कार्यकाळ हा तसा वादग्रस्त ठरला. त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये गोळा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील त्यांचे विश्वासू कर्मचारी आणि फील्डवर काम करणारे आरोग्य कर्मचारी यांना बदलीसाठीची रक्कम गोळा करण्यासाठी नेमलेले होते. सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच अन्य जिल्ह्यामध्ये बरेच कर्मचारी २५ ते ३० वर्ष एकाच ठिकाणी काम करीत होते. अशांनाही आरोग्य पर्यवेक्षकपदी पदोन्नती देताना पुन्हा मुळच्याच ठिकाणी पदोन्नती दिलेल्या आहेत. म्हणजे आता त्या कर्मच्याऱ्यांनी पुर्ण नोकरी ही एकाच तालुक्यात केलेल्या असताना, डॉ. राधाकिशन पवार यांनी पुन्हा अशाच कर्मचाऱ्यांवर एवढी मेहरबानी दाखवण्या मागे नेमके प्रयोजन काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सदरच्या प्रकरणी चौकशी समिती नेमूण डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ…
कास्ट्राईब संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना निवेदन देत आरक्षण धोरण कायदा 2004 ची पायमल्ली आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देताना प्रत्येकी लाखो रुपये घेतल्याबाबत डॉ. राधाकिशन पवार यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ केली.
हे ही वाचा वैराग येथील खून प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता
अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहिर
पुणे जलसंपदा विभागाच्या दक्षता पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याचे आश्वासन